Attention to the observer at the expense of Star Campaigner | स्टार कॅम्पेनरच्या खर्चावर निरीक्षक ठेवणार लक्ष
स्टार कॅम्पेनरच्या खर्चावर निरीक्षक ठेवणार लक्ष

नाशिक : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी करणारे उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी सर्वच उमेदवारांकडून स्टार कॅम्पेनर जसे पक्षाचे वरिष्ठ नेते वा चित्रपट अभिनेते, तारकांना पाचारण केले जाते, त्यांच्या या प्रचाराचा उमेदवाराला कितपत लाभ होतो याविषयी साशंकता असली तरी, अशा स्टार कॅम्पेनरवर व त्यांच्या उठबैसवर लाखो रुपये खर्च केले जातात. त्यामुळे सहायक निवडणूक खर्च निरीक्षकांनी अशा स्टार कॅम्पेनरच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
या संदर्भात मंगळवारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी खर्चाविषयीचा आढावा घेण्यासाठी आयोगाकडून नेमणूक केलेल्या निवडणूक निरीक्षकांच्या मदतीसाठी नियुक्ती करण्यात येणाऱ्या सहायक खर्च निरीक्षकांची बैठक घेतली. त्यात आनंदकर यांनी निवडणूक निरीक्षक यांच्यासोबत केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांची नेमणूक सहायक खर्च निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या या बैठकीस मुख्य वित्त व लेखा अधिकारी बोधी किरण, कोषागार अधिकारी व्ही.जी. गांगुर्डे, तहसीलदार प्रशांत पाटील, रचना पवार, लेखाधिकारी वाय.आर. झोले, एम.के. मिश्रा, संजय जोशी तसेच बीएसएनएल, प्रतिभूती मुद्रणालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
परवानग्या, खर्चावर राहणार नजर
राजकीय पक्ष तसेच उमेदवाराकडून स्टार कॅम्पनिंगद्वारे होणाºया खर्चाचा तपशील, निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम बॅँक खात्यात जमा करणे किंवा काढणे तसेच उमेदवाराच्या खात्यातून दहा लाखांहून अधिक रक्कम काढणे किंवा जमा करणेबाबत माहिती मिळविण्यासाठी बँक अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याची सूचना आनंदकर यांनी यावेळी केली. सहायक खर्च निवडणूक निरीक्षकांनी काम करताना राजकीय पक्ष व उमेदवार यांनी केलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे काम व निवडणूकविषयी देण्यात येणाºया विविध परवानग्या त्यानुसार त्यावर होणाºया खर्चाचा तपशील ठेवण्याची सूचना केली.


Web Title: Attention to the observer at the expense of Star Campaigner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.