नाशकात सभागृह नेते सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:07 PM2021-05-05T17:07:43+5:302021-05-05T17:10:06+5:30
Crime News : इंदिरा नगर येथे मनपाचे सभागृह नेते बापू सोनवणे यांच्या कार्यालयाची 10 ते 15 जणांच्या टोळी कडून तोडफोड
नाशिक : महापालिकेचे सभागृह नेता सतीश सोनवणे यांच्या राजीवनगर येथील संंपर्क कार्यालयावर संशयित आरोपी सागर देशमुख याने सुमारे दहा ते पंधरा हल्लेखोरांच्या टोळीसह हल्ला चढविला. यावेळी कार्यालयाची तसेच शासकीय
वाहनाची तोडफोड केली.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी कार्यालयात सोनवणे नसल्याने मोठा अनर्थ टळला. बुधवारी (दि. ५) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सोनवणे यांच्या राजीवनगर येथील कार्यालयावर आठ ते दहा मोटारसायकलवर संशयित सागर हा टोळक्याला घेऊन आला. यावेळी त्याने व त्याच्या साथीदारांनी दगडफेक करत कार्यालयाची तोडफोड सुरु केली. कार्यालयाबाहेर उभी असलेले मनपाचे शासकीय वाहनही यावेळी फोडण्यात आले.
नाशिक: इंदिरा नगर येथे मनपाचे सभागृह नेते बापू सोनवणे यांच्या कार्यालयाची 25 ते30 जणांच्या टोळी कडून तोडफोड;घटनास्थळी पोलीस दाखल
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2021
केबल ग्राहकांकडून आलेले सुमारे साडेबारा हजार रुपये टोळक्यांनी लुटून नेले. ‘आम्ही पुन्हा रात्री येऊ तेव्हा सगळ्यांचा कार्यक्रम करू...’ असा दम देखील यावेळी टोळक्याने भरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. घटनेची माहिती मिळताच
इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जमावाला शांत करत कारवाईचे ठोस आश्वासन दिले.