मांजरपाडा प्रकल्पास राज्यमंत्रीमंडळाची मान्यता;पुणेगाव पोहोच कालव्यासही मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 03:08 PM2017-11-01T15:08:39+5:302017-11-01T15:09:37+5:30

८६ टक्के काम पुर्ण पश्चिम वाहिनी, पुर्व वाहिनी खोरे दुभाजक रेषेच्या पश्चिम बाजुला वाहत जाणारे छोटे छोटे नाले तीव्र उतार सुरू होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडविणे, त्यांच्या सांडवा पुर्व बाजुला का ढून सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पूर्व बाजुला गोदावरी खोºयात वळविणे असे या योजनांचे स्वरूप आहे. मांजरपाडा प्रकल्पातील ८.९६ किमी लांबीच्या बोगद्याचे ८६ टक्के तर धरणाचे व सांडव्याचे जवळपास ६५ टक्के काम पुर्ण झालेले आहे.

The approval of the Council of Ministers of the Manjrapada project; | मांजरपाडा प्रकल्पास राज्यमंत्रीमंडळाची मान्यता;पुणेगाव पोहोच कालव्यासही मंजुरी

मांजरपाडा प्रकल्पास राज्यमंत्रीमंडळाची मान्यता;पुणेगाव पोहोच कालव्यासही मंजुरी

Next
ठळक मुद्दे२००९ मध्ये नाशिक येथे झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या वळण योजनेला मंजुरी देण्यात आली होती.

नाशिक : पश्चिम वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोºयात आणून नाशिक जिल्ह्याला वरदान ठरू पाहणाºया मांजरपाडा प्रकल्पास राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्याबरोबरच पुणेगाव दरसवाडी व डोंगरगाव पोहोच कालव्याची रखडलेल्या कामांच्याही सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
येवल्याचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने २००९ मध्ये नाशिक येथे झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या वळण योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पुर्व वाहिनी खोºयांमध्ये वळविण्यासाठी जलसंपदा विभागाने महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडवून हे पाणी गोदावरी खोºयात वळविण्यासाठी भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झालेल्या मांजरपाडासह इतर प्रवाही वळण योजनांचे अंतीम टप्प्यातील कामे रखडलेली होती. त्यामुळे या प्रकल्पाच्या सुधारित मान्यतेसाठी भुजबळ यांनी तुरूंगात असूनही पत्रांद्वारे तसेच विधानसभेच्या अधिवेशनात सतत पाठपुरावा केला होता. या सदर प्रवाही वळण योजनांमध्ये सुरगाणा तालुाक्यातील मांजरपाडा तर दिंडोरी तालुक्यातील गोळशी महाजे, ननाशी, पायरपाडा, प्रिंपज, आंबेगाव, झालींपाडा, धोंडाळपाडा, चाफ्याचा पाडा, रानपाडा, गोळशी, हट्टीपाडा, पळसविहीर, चिल्लरपाडा इत्यादी वळण योजनांचा समावेश आहे. या प्रवाही योजनांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोºयामध्ये वळवले जाणार आहे. हे पाणी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी, चांदवड, निफाड, येवला या तालुक्यांना उपलब्ध होणार असून, येथील क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येणार आहे. त्याच बरोबर सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील स्थानिक शेतकºयांच्या वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात आल्याने सदर प्रकल्पाच्या जवळच्या शेतकºयांना फायदा होऊन सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील सिंचनात सुध्दा वाढ झाली आहे.
 

Web Title: The approval of the Council of Ministers of the Manjrapada project;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण