‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे भरता येणार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:12 AM2019-03-13T00:12:09+5:302019-03-13T00:26:39+5:30

आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाने पालकांना मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक अर्ज करता येणार असून, अर्ज करताना गुगल मॅपद्वारे घरचा पत्ता, शाळेचे अंतर असे सर्व ट्रॅकिंग होणार आहे. तसेच आरटीईच्या या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्जही भरता येत आहे.

Application to fill out 'Mobile app' | ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे भरता येणार अर्ज

‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे भरता येणार अर्ज

Next
ठळक मुद्देआरटीई प्रवेश : ४५७ शाळांमध्ये ५ हजार ७६४ जागा

नाशिक : आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाने पालकांना मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक अर्ज करता येणार असून, अर्ज करताना गुगल मॅपद्वारे घरचा पत्ता, शाळेचे अंतर असे सर्व ट्रॅकिंग होणार आहे. तसेच आरटीईच्या या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्जही भरता येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये यंदा ५ हजार ७६४ जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार असून, आरटीई अंतर्गत नाशिक तालुक्यातील १९ खासगी शाळांमध्ये २२१ विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक व प्राथमिक इयत्तेसाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी ५ ते २२ मार्च या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
पालकांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे यापूर्वीच करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९ व २०२० याकरिता शिक्षणहक्क कायद्यांतर्गत आर्थिक व दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांसाठी ५ मार्चपासून आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही शिक्षणहक्कची प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव असलेल्या ५७६४ जागांमध्ये पूर्व प्राथमिकच्या (नर्सरी) १२१ जागांचा समावेश आहे़ यात बागलाण तालुक्यात २८, दिंडोरी तालुक्यात ३४ व नाशिक मनपा क्षेत्रात ३९ जागा उपलब्ध आहेत़ तर, पहिलीसाठी जिल्ह्यात ५६४३ जागा उपलब्ध आहे़ या जागांवर ५ मार्चपासून प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत ६७२८ विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज आरटीईच्या संकेतस्थळावर दाखल झाले आहेत़
जिल्ह्यात आतापर्यंत ६७२८ अर्ज
आरटीई प्रवेशप्रक्रियेत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६७२८ अर्ज दाखल झाले आहेत़ यात ६७२१ अर्ज आॅनलाइन पद्धतीन,े तर ७ अर्ज मोबाइल अ‍ॅपवरून दाखल करण्यात आले आहे़ नाशिक जिल्ह्यात ४५७ शाळांमध्ये ५,७६४ जागांसाठी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे़ यात नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागात १९ शाळांमध्ये २२१, तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ९२ शाळांमध्ये १८२१ जागांवर आरटीईअंतर्गत प्रवेश होणार आहे़

Web Title: Application to fill out 'Mobile app'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.