नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडून दुसऱ्या कैद्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:47 AM2018-12-11T00:47:54+5:302018-12-11T00:48:11+5:30

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याने हातातील बेडीने दुसºया कैद्याच्या डोक्यावर मारून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Another prisoner assaulted by prisoner in Nashik Road central jail | नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडून दुसऱ्या कैद्याला मारहाण

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडून दुसऱ्या कैद्याला मारहाण

Next

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्याने हातातील बेडीने दुसºया कैद्याच्या डोक्यावर मारून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारागृहात रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मनोरूग्ण कैदी सचिन कन्हैय्या चावरे (रा. गोरेवाडी नाशिकरोड) हा बॅरेक क्रमांक तीनजवळील स्वच्छतागृहात शौचास गेला होता. चावरे याच्या हातात हातकडी होती. यावेळी कैदी शशिकांत ऊर्फ पप्पू शिवानंद झुरळे (रा. अंदुर, ता. तुळजापूर) हा स्वच्छतागृहाकडून पाण्याची बाटली घेऊन जात असताना यावेळी सचिन चावरे याने शशिकांत यास बोलावून घेत मदत करण्यास सांगितले.
शशिकांत हा खाली वाकला असता सचिनने शशिकांतच्या डोक्यावर हातातील हातकडीने डोक्यात मारल्याने डोके फुटून रक्तस्त्राव होऊ लागला. घडलेली घटना बघून आजूबाजूच्या कैद्यांनी जखमी शशिकांत याला त्वरित कारागृहातील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. तेथून शशिकांतला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वीदेखील कैदी चावरे याने काही कैद्यांसह अधिकाºयांवरदेखील हल्ले केले आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर बालुसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कैदी चावरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवकाचा मृत्यू
लोहशिंगवे येथील भाऊसाहेब जुंद्रे यांच्या मळ्यात राहणारा युवक शांताराम दगडू भले याला शनिवारी रात्री उलट्या होऊ लागल्याने जिल्हा रूग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. शांताराम भले यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Another prisoner assaulted by prisoner in Nashik Road central jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.