नंदिनी नदीच्या अस्वच्छतेबाबत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:53 AM2019-01-30T00:53:24+5:302019-01-30T00:53:44+5:30

महापालिकेचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांपासून नासर्डी नदीत मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला दिसत असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Angry about the Nadini river's uncleanness | नंदिनी नदीच्या अस्वच्छतेबाबत नाराजी

नंदिनी नदीच्या अस्वच्छतेबाबत नाराजी

googlenewsNext

सिडको : महापालिकेचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांपासून नासर्डी नदीत मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला दिसत असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गोदामाई सामाजिक संस्थेने नाराजी व्यक्त केली आहे. नंदिनी नदीची स्वच्छता करावी, याबाबत संस्थेच्या वतीने सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांना निवेदन देण्यात आले.  नंदिनी नदीच्या संदर्भात लोकमत वृत्तपत्राने सद्यस्थितीची सत्य परिस्थिती मांडली. नंदिनी नदीत प्रचंड अस्वच्छता असून, औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी तसेच नागरिकांचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. केवळ पावसाळ्यात वाहणाºया या नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. त्यामुळे एरव्ही नासर्डी म्हटल्या जाणाºया या नदीपात्रातील प्रदूषण कमी करून तिला प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प काही सदस्यांनी केला होता. मात्र नासर्डीची नंदिनी करण्याचा प्रयत्न आता तरी फसला असून, नंदिनी नदी तर नासर्डीच, असे म्हणायची वेळ आली आहे. हे सर्व प्रकार थांबवून नंदिनी नदीत स्वच्छता मोहीम राबवून तिला प्रदूषण मुक्त करावे, अशी मागणी नाशिकची आई, गोदामाई या सामाजिक संस्थेच्या वतीने सिडको सभापती हर्षा बडगुजर यांच्याकडे केली. याप्रसंगी रवि वाघ, रोहन कानकाटे, अक्षय परदेशी, मयूर बगाड, स्वप्नील जाधव, कमलेश भोर, सचिन महाजन, मयूर लवटे, रोहित कुलकर्णी, रोहित ताराबादकर आदी उपस्थित होते.
नदीच्या स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च
नंदिनी नदीच्या स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र काही दिवसांत परिस्थिती ‘जैसे-थे’च दिसून येत आहे. मनपाने याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी गोदामाई संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मनपाच्या संबंधित अधिकाºयांना कळवून नंदिनीची स्वच्छता करण्यात येईल, असे सभापती हर्षा बडगुजर यांनी संस्थेच्या सदस्यांना सांगितले.

Web Title: Angry about the Nadini river's uncleanness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.