महापौरांच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे उपोषण मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 02:11 AM2018-09-20T02:11:47+5:302018-09-20T02:14:03+5:30

पालिकेच्या महासभेत अंगणवाड्या बंद करण्याचा विषय तापला

anganwadi sevika ends hunger strike | महापौरांच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे उपोषण मागे

महापौरांच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे उपोषण मागे

googlenewsNext

नाशिक: महापालिकेने बंद केलेल्या 136 अंगणवाडीमधील सेविकांनी दोन दिवसांपासून सुरू केलेले आमरण उपोषण आज मध्यरात्री 1 वाजता मागे घेतले. महापौर रंजना भानसी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्याचे फेर सर्वेक्षण करण्यात येईल तसेच या सेविका आणि मदतनीस यांना पुन्हा सेवेत घेण्यात येईल, या अटींवर हे उपोषण समाप्त करण्यात आले. मंगळवारपासून मनपा मुख्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचे आमरण उपोषण सुरू होते.

महापालिकेच्या १३६ अंगणवाड्या बंद करण्याच्या विषयावरून महापालिकेत आज पुन्हा जोरदार चर्चा झाली. या बंद पडलेल्या अंगणवाड्यांचे फेरसर्वेक्षण करावे तसेच तोपर्यंत अंगणवाड्या बंद करू नये, या मागील महासभेतील आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. बंद पडलेल्या अंगणवाड्यांमधील सेविकांनी मनपाच्या प्रवेशद्वारावरच आमरण उपोषण सुरू केल्याने त्याचे तीव्र पडसाद आज महासभेत उमटले. सभागृह नेता दिनकर पाटील यांच्यासह अन्य अनेक नगरसेवकांनी अंगणवाडी सेविकांच्या समस्येवर भर दिला. गेल्या महिन्याच्या महासभेत आदेश देऊनही प्रशासन याबाबत अंमलबजावणी करत नसल्याने महासभेतील निर्णयांचा काय उपयोग, असा प्रश्न नगरसेवकांनी केला. अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका आत्महत्या करण्याच्या मन:स्थितीत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. अखेरीस महापौर रंजना भानसी यांनी अंगणवाडी सेविकांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिला. आमरण उपोषणादरम्यान पाच अंगणवाडी सेविकांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 

Web Title: anganwadi sevika ends hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक