सप्तशृंग गडाला दिलेली रुग्णवाहिका नांदुरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 04:31 PM2019-07-05T16:31:52+5:302019-07-05T16:32:22+5:30

रुग्णांची गैरसोय : गडावरच सुविधा पुरविण्याची मागणी

Amphibonica given to Saptashringra castle Nanduri | सप्तशृंग गडाला दिलेली रुग्णवाहिका नांदुरीला

सप्तशृंग गडाला दिलेली रुग्णवाहिका नांदुरीला

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णवाहिकेला घाट चढून येण्यासाठी कमीतकमी अर्धा तास लागतो. त्यात वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो.

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर भाविकांच्या व ग्रामस्थांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासनातर्फे पुणे येथील भारत विकास गु्रपसह महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हीसने अत्याधुनिक रूग्णवाहिका दिली होती परंतु, परंतु सदर रुग्णवाहिका गडाला की नांदुरी आरोग्य केंद्राला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चार पाच वर्षा पूर्वी मोठा गाजावाजा करीत ढोल ताशांच्या गजरात सपूंर्ण गावातून या रूग्णवाहिकेची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी ट्रस्टचे अधिकारी, गावातील नेते मंडळी, सरंपचासह सदस्य या कार्यक्र माला उपस्थित होते तसेच या रूग्णवाहिकेचा शुभारंभ ट्रस्टच्या धर्मार्थ रूग्णालयात करण्यात आला होता. सुरुवातीला पंधरा ते वीस दिवस या रूग्णवाहिकेने चागंल्या पद्धतीने सेवा पुरविली. परंतु अचानकपणे रुग्णवाहिका नांदुरी आरोग्य केंद्रात निघून गेल्याने ती परत गडावर आलीच नाही.
रूग्णवाहिका नांदूरी आरोग्य केंद्रालाच द्यायची होती तर गडावर फक्त भाविकांच्या व ग्रामस्थांच्या समाधानासाठीआणण्यात आली होती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सप्तशृंगगडावर धर्मार्थ दवाखाना व जिल्हा परिषदेचे उपआरोग्य केंद्र आहे परंतु याठिकाणी निवासी डॉक्टर नसल्यामुळे भाविक रुग्ण तसेच ग्रामस्थांचे हाल होत असतात. याठिकाणी तत्काळ उपचार मिळण्यासाठी रुग्णवाहिका अत्यावश्यक आहे. परंतु ती १० किलोमीटर अंतरावर नांदुरी येथे उपलब्ध आहे. रुग्णवाहिकेला घाट चढून येण्यासाठी कमीतकमी अर्धा तास लागतो. त्यात वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. सप्तशृंगगडावर जाण्यासाठी घाट माथ्याचा रस्ता आहे. डोगंराळ भाग आहे. त्यामुळे दरडी कोसळणे, छोटे मोठे अपघात होत असतात. त्यासाठी गडावर रुग्णवाहिकेची नितांत गरज आहे.

Web Title: Amphibonica given to Saptashringra castle Nanduri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.