मानव उत्थानतर्फे उबदार कपडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:00 AM2018-12-20T01:00:09+5:302018-12-20T01:00:48+5:30

शहरात वाढलेली थंडी आणि आगामी ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर मानव उत्थान मंचाकडून ‘बिइंग सांता’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

 Allocated warm clothing by human uplift | मानव उत्थानतर्फे उबदार कपडे वाटप

मानव उत्थानतर्फे उबदार कपडे वाटप

Next

नाशिक : शहरात वाढलेली थंडी आणि आगामी ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर मानव उत्थान मंचाकडून ‘बिइंग सांता’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत त्र्यंबकेश्वर बसस्थानकासह शहरातील सातपूर, पंचवटी अमरधाम, गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर मैदान, रोकडोबा मैदान, गौरी पटांगण, रामकुंड आदी भागात उघड्यावर जीवन जगणाऱ्या गोरगरिबांना सुमारे ५०० ब्लॅँकेट, ८० गोधड्यांचे वाटप करण्यात आले.  या उपक्रमासाठी मंचाकडून समाजातील दानशुरांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी काही नागरिकांनी रोख रक्कम तर काहींनी जुन्या कपड्यांच्या स्वरूपात मदत केली. यामुळे १ लाख दहा हजारांचा निधी उभारण्यात आल्याचे समन्वयक जसमीत सहेमी यांनी सांगितले.

Web Title:  Allocated warm clothing by human uplift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.