दांडी मारणाऱ्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:48 AM2019-03-06T00:48:34+5:302019-03-06T00:50:35+5:30

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व तारखांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने आयोगाने सर्वच विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांना पूर्वतयारीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देऊन या निवडणुकीसाठी लागणाºया कर्मचाºयांना निवडणूक पूर्वप्रशिक्षण देण्याचे सक्तीचे करण्यात आलेले असताना नाशिक जिल्ह्णातील चौदा मतदारसंघांतून जवळपास ३७२३ कर्मचाºयांनी या प्रशिक्षणाला दांडी मारल्याचे उघडकीस आले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय या कर्मचाºयांची माहिती गोळा करण्यात आली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Action will be taken on three to three employees sticking out | दांडी मारणाऱ्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

दांडी मारणाऱ्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

Next
ठळक मुद्देनिवडणूक पूर्वप्रशिक्षण : नोटिसा देऊन खुलासा मागविणार

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व तारखांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने आयोगाने सर्वच विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांना पूर्वतयारीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देऊन या निवडणुकीसाठी लागणाºया कर्मचाºयांना निवडणूक पूर्वप्रशिक्षण देण्याचे सक्तीचे करण्यात आलेले असताना नाशिक जिल्ह्णातील चौदा मतदारसंघांतून जवळपास ३७२३ कर्मचाºयांनी या प्रशिक्षणाला दांडी मारल्याचे उघडकीस आले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय या कर्मचाºयांची माहिती गोळा करण्यात आली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाने या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या कामासाठी नेमल्या जाणाºया कर्मचाºयांची नावे, पत्ते, कार्यालयाची माहिती हुद्यासह विचारली असून, या कर्मचाºयांच्या भ्रमणध्वनीसह माहिती आयोगाला कळविण्यात आली आहे. आयोगाच्या मते निवडणूक तारखा घोषित झाल्यानंतर निवडणूक अधिकाºयांच्या पाठीशी असलेला कामाचा व्याप पाहता, त्यावेळी कर्मचाºयांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही, शिवाय निवडणूक काळात तीन प्रशिक्षण वेगवेगळ्या पातळीवर द्यावे लागते, त्यामुळे ज्या कर्मचाºयांची निवडणूक कामासाठी नेमणूक करण्यात येणार आहे त्यांना निवडणूक पूर्वतयारीची माहिती व्हावी याची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक जिल्ह्णातील चौदा मतदारसंघात फेब्रुवारीच्या अखेरच्या व मार्चच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाºयांच्या प्रशिक्षण त्या त्या मतदार संघाच्या मुख्यालयी निवडणूक अधिकाºयांनी आयोजित करून त्यांना माहिती दिली. जिल्ह्णात या निवडणुकीसाठी किमान ३२ हजारांहून अधिक कर्मचारी व अधिकाºयांची गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत आयोजित केलेल्या निवडणूक पूर्वप्रशिक्षणाला २७ हजार ३५४ अधिकारी, कर्मचाºयांपैकी २३ हजार ६३१ इतकेच कर्मचारी, अधिकारी हजर राहिले, ३,७२३ कर्मचाºयांनी प्रशिक्षणाकडे पाठ फिरविली. या सर्व कर्मचाºयांची महिती निवडणूक शाखेने मागविली असून, त्यात गैरहजर कर्मचाºयांना प्रारंभी कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागविण्याचा व त्यात समाधान न झाल्यास लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.दिंडोरी, पेठचे लवकरच प्रशिक्षणजिल्ह्यातील चौदा मतदारसंघात निवडणूक पूर्वप्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, फक्त दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाचे प्रशिक्षण बाकी आहे. परंतु अन्य मतदारसंघात गैरहजर असलेल्या कर्मचाºयांवर कारवाई होण्याच्या वृत्ताने शासकीय कर्मचाºयांमध्ये धावपळ उडाली असून, काहींनी निवडणुकीचे कामच नको म्हणून प्रयत्नही सुरू केले आहेत.

Web Title: Action will be taken on three to three employees sticking out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार