जादा सुट्या घेतल्या असतील तर कारवाई

By Admin | Published: November 25, 2015 11:39 PM2015-11-25T23:39:59+5:302015-11-25T23:41:40+5:30

औताडे : सिंहस्थातील सुट्यांचा घोळ

Action taken if additional holidays are taken | जादा सुट्या घेतल्या असतील तर कारवाई

जादा सुट्या घेतल्या असतील तर कारवाई

googlenewsNext

नाशिक : सिंहस्थ पर्वणी काळात दोन्ही तालुक्यांतील शाळांना दिलेल्या सहा सुट्या दिवाळीच्या सुटीत कमी करण्याचे आदेश असताना काही शाळांनी जर त्यांच्या अधिकारात जादा सुट्या घेतल्या असतील तर त्यांची चौकशी करून अशा शाळांच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी दिला आहे. शहर व जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी त्यांच्या सोयीने दिवाळीच्या सुट्या जाहीर करून शाळा सुरू करण्याची तारीख एक न ठेवता मागे पुढे केल्यावरून वाद उद्भवला आहे. सिंहस्थ पर्वणी काळात नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना पर्वणी काळात सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. माध्यमिक विभागाच्या शाळांना पर्वणी काळात सहा दिवसांच्या जादाच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या दिवाळीच्या सुट्यांमधून कमी करून माध्यमिक विभागाच्या शाळा दिवाळीनंतर २४ नोव्हेंबरला सुरू करण्याचे लेखी आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी माध्यमिक विभागाच्या शाळांना दिले होते. प्रत्यक्षात या शाळा २४ नोव्हेंबर २६ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर अशा वेगवेगळ्या तारखांना सुरू होणार असल्याने याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सर्वांना २४ नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याचे लेखी आदेश दिले होते. आता दोषी शाळांवर कारवाई करण्यात येईल असे औताडे यांनी सांगितले.

Web Title: Action taken if additional holidays are taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.