आठ महिन्यांत कार्यवाही : खरकटे न टाकण्याचे आवाहन पाच हजार श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:25 AM2017-12-17T01:25:36+5:302017-12-17T01:26:20+5:30

शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यापासून वाढणारा उपद्रव यामुळे नागरिक त्रस्त असतानाच महापालिकेने गेल्या आठ महिन्यांत पाच हजारांहून अधिक श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली आहे. दरम्यान, नागरिकांनी रस्त्यावर उष्टे-खरकटे टाकू नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

Action in eight months: Dismissal Surgery on 5,000 Thousand Dogs | आठ महिन्यांत कार्यवाही : खरकटे न टाकण्याचे आवाहन पाच हजार श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया

आठ महिन्यांत कार्यवाही : खरकटे न टाकण्याचे आवाहन पाच हजार श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया

Next
ठळक मुद्देहैदराबाद येथील खासगी संस्थेला ठेका ९३६ श्वानांचे निर्बीजीकरण

नाशिक : शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यापासून वाढणारा उपद्रव यामुळे नागरिक त्रस्त असतानाच महापालिकेने गेल्या आठ महिन्यांत पाच हजारांहून अधिक श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली आहे. दरम्यान, नागरिकांनी रस्त्यावर उष्टे-खरकटे टाकू नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
शहरात गेल्या काही दिवसांत मोकाट कुत्र्यांनी चावे घेण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार, नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने नेमलेल्या ठेकेदारामार्फत सदर कुत्र्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. महापालिकेने श्वान निर्बीजीकरणासाठी हैदराबाद येथील नवोदया व्हेट सोसायटी या खासगी संस्थेला ठेका दिला असून, गेल्या आठ महिन्यांत पाच हजारांहून अधिक श्वानांचे निर्बीजीकरण झाले आहे. एप्रिल महिन्यात २२४, मे-४८२, जून-८६४, जुलै-८०२, आॅगस्ट-८४८, सप्टेंबर-७१९, तर आॅक्टोबरमध्ये ९३६ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. नोव्हेंबर-डिसेंबर हा श्वानांचा विनीचा काळ असतो. मादी श्वान पिल्लांना धोका होऊ नये यासाठी आक्रमक होण्याची शक्यता असते. शहरात सातपूरसह काही ठिकाणी चावे घेण्याचे प्रकार घडले असून, त्यात अशाच मादी आढळून आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत महापालिकेने अशा तीन ते चार मादी ताब्यात घेऊन त्यांना विल्होळी येथील केंद्रात ठेवले आहे. दरम्यान, नागरिकांनी रस्त्यावर उष्टे खरकटे टाकू नये. उघड्यावर अन्न मिळत असल्याने मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत असतो. त्यामुळे नागरिकांनी घंटागाडीत ओला कचरा टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Action in eight months: Dismissal Surgery on 5,000 Thousand Dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.