मालेगावी सात जणांविरुद्ध तडीपारीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 05:52 PM2019-02-07T17:52:47+5:302019-02-07T17:53:09+5:30

मालेगाव : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व गंभीर गुन्हे असलेल्या सात जणांविरुद्ध प्रांत अधिकारी अजय मोरे यांनी तडीपारीची कारवाई केली आहे. तर ११ तडीपारीच्या प्रस्तावांवर १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे.

 Action against the seven people in Malegaon | मालेगावी सात जणांविरुद्ध तडीपारीची कारवाई

मालेगावी सात जणांविरुद्ध तडीपारीची कारवाई

googlenewsNext

शहर शांततेला बाधा पोहोचविणाऱ्या गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी उपविभागीय दंडाधिकारी अजय मोरे यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावांवर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी घेण्यात आली. संवेदनशिल समजल्या जाणाºया मालेगाव शहरात गंभीर घटनांना आळा बसावा यासाठी गुरूवारी प्रांत अधिकारी मोरे यांनी सात जणांच्या तडीपारीचे आदेश पारीत केले आहे. यात मो. अली मो. शफीक अहमद (सहा महिने), दिनेश नाना जाधव (सहा महिने), मो. सुफीयान शेख जमशेद (एक वर्ष), रफीक शहा हमीद शहा (एक वर्ष), मोहंमद यासीन शफीक अहमद (सहा महिने), रज्जबअली तय्यबअली (एक वर्ष), मोहंमद एकलाख मो. शरीफ (एक वर्ष) आदिंचा समावेश आहे. तर उर्वरित ११ तडीपारीच्या प्रस्तावांवर १५ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी घेण्यात येवून तडीपारीचे आदेश पारीत केले जातील, अशी माहिती प्रांत अधिकारी अजय मोरे यांनी दिली.

Web Title:  Action against the seven people in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.