जिल्हा रुग्णालयातील शिक्क्यांचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:39 AM2019-03-16T01:39:09+5:302019-03-16T01:39:29+5:30

जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांचा शिक्का रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली असून, या शिक्क्यांचा विविध कारणांसाठी गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Abuse of District Stamps | जिल्हा रुग्णालयातील शिक्क्यांचा गैरवापर

जिल्हा रुग्णालयातील शिक्क्यांचा गैरवापर

googlenewsNext
ठळक मुद्देबनावट असल्याचा संशय : अतिरिक्त जिल्हा चिकित्सकांच्या स्टॅम्पचाही समावेश

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय शिक्क्यांसह अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांचा शिक्का रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली असून, या शिक्क्यांचा विविध कारणांसाठी गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळलेले शिक्के हे बनावट असून, त्याने बाजार पेठेतील शिक्के तयार करणाऱ्या कारागिराकडून तयार करून घेतल्याचा संशय जिल्हा प्रशानाने व्यक्त केला आहे.
जिल्हा रुग्णालयाचा गोल शिक्का (सील) आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकि त्सकांच्या पदाचा शिक्का असे दोन शिक्के जिल्हा रुग्णालय प्रशासनाबाहेरील व्यक्तीकडे आढळले आहे. त्यामुळे या शिक्क्यांचा अंपगत्वाचे दाखले, शारीरिक तंदुरुस्तीचे दाखले, वयाचे दाखले, त्याचप्रमाणे सरकारच्या विविध योजनांसाठी आवश्यत वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी या शिक्क्यांचा गैरवापर झाला असण्याची शक्यता व्यक्त होत
आहे.
जिल्हा रुग्णालय अधीक्षक नानासाहेब निकम व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे
या प्रकरणाची सरकार वाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचा प्रक्रिया सुरू होती.
रूग्णालय प्रशासन अडचणीत
जिल्हा रुग्णालयाच्या गोल शिक्क्यासोबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पदाचाही शिक्का बाहेरील व्यक्तीकडे आढळल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत सापडले आहे. सध्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. निखिल सैंदाणे कार्यभार सांभाळत असून, शिक्क्यांचा गैरवापर करणाऱ्यांनी अतिरिक्त शल्य चिकित्सकांच्याही बनावट स्वाक्षºया केल्या आहेत काय याविषयी साशंकता व्यक्त होत असून, या प्रकरणात जिल्हा रुग्णालय प्रशासनातील कोणी कर्मचारीही यात सहभागी आहेत काय याविषयी साशंकता व्यक्त केली जात असल्याने रुग्णालया प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

Web Title: Abuse of District Stamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.