गतवर्षीच्या तुलनेत ६९ने वाढला जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:46 AM2018-07-17T00:46:39+5:302018-07-17T00:48:42+5:30

गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध ‘आमची मुलगीक़ॉम’ या शासनाच्या संकेतस्थळावर केल्या जाणाºया तक्रारी व घेतली जाणारी तत्काळ दखल, गर्भलिंगनिदान करणाºया डॉक्टरांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये दाखल झालेले गुन्हे, न्यायालयाने सुनावलेल्या कठोर शिक्षा, आरोग्य विभागाद्वारे केली जाणारी जनजागृती तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत यांसारख्या विविध उपक्रमांमुळे नाशिक जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत मुलींच्या जन्मदरात ६९ने वाढ झाली आहे़ सन २०१६-१७ मध्ये दर हजार मुलांमागे जन्मास येणाºया ९१३ मुलींवरून ही संख्या आता ९८२ झाली आहे़

 69 compared to last year, the birth rate of girls in the district | गतवर्षीच्या तुलनेत ६९ने वाढला जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर

गतवर्षीच्या तुलनेत ६९ने वाढला जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर

googlenewsNext

नाशिक : गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध ‘आमची मुलगीक़ॉम’ या शासनाच्या संकेतस्थळावर केल्या जाणाºया तक्रारी व घेतली जाणारी तत्काळ दखल, गर्भलिंगनिदान करणाºया डॉक्टरांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये दाखल झालेले गुन्हे, न्यायालयाने सुनावलेल्या कठोर शिक्षा, आरोग्य विभागाद्वारे केली जाणारी जनजागृती तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत यांसारख्या विविध उपक्रमांमुळे नाशिक जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत मुलींच्या जन्मदरात ६९ने वाढ झाली आहे़ सन २०१६-१७ मध्ये दर हजार मुलांमागे जन्मास येणा-या ९१३ मुलींवरून ही संख्या आता ९८२ झाली आहे़  मुलगा व मुलगी यांच्या व्यस्त जन्मदराबाबत देशभरातून निवडण्यात आलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश झाल्याने ही चिंतेची बाब ठरली होती़ त्यामुळे गतवर्षी शासनाने स्त्रीभ्रूणहत्याविरोधी मोहीम, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांवर दाखल झालेले गुन्हे, निफाड न्यायालयाने सुमारे दोन वर्षांपूर्वी पीसीपीएनडीटी कायद्यान्वये डॉक्टरांना सुनावलेली शिक्षा या सर्वांचे एकत्रित चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत़
नाशिक जिल्ह्यात सन २०१६-२०१७ मध्ये ९१३ असलेला मुलींचा जन्मदर हा २०१७-१८ मध्ये ९८२ इतका झाला आहे़ केंद्र व राज्य शासनाकडून स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून, मुख्य म्हणजे, असे वर्तन करणाºया वैद्यकीय व्यावसायिकांना न्यायालयाने कठोर शिक्षादेखील सुनावली आहे़ यामुळे गर्भलिंग तपासणीसारख्या गैरप्रकाराला चांगलाच आळा बसला आहे़ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले असून, यासाठी आरोग्य, महसूल व पोलीस विभाग यांच्यातील समन्वयही तितकाच प्रभावी ठरला आहे़
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलींच्या जन्मदरामध्ये ६९ने वाढ झाली असून, सेक्स रेशो दर हजार मुलांमागे ९८२ इतका झाला आहे़ शासनाच्या वेबसाइटवर गर्भलिंग तपासणी करणाºया डॉक्टरांविरुद्धच्या तक्रारी, पोलिसांत दाखल होणारे गुन्हे, न्यायालयाकडून होणारी शिक्षा यामुळे गर्भलिंग तपासणीसारख्या गैरप्रकाराला वचक बसला आहे़ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा यांच्यामुळे हे शक्य झाले आहे़ तसेच जिल्ह्यात आणि शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बेटीबचाव अभियान राबविण्यात येत आहे.
- डॉ़ सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

Web Title:  69 compared to last year, the birth rate of girls in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.