नाशकात दररोज खेळला जातोय ६५ लाखांचा ‘मटका’

By Vijay.more | Published: September 10, 2018 05:56 PM2018-09-10T17:56:30+5:302018-09-10T18:05:01+5:30

नाशिक : बेकायदेशीर मात्र विश्वसनीय अन् पोलिसांच्या कृपाशीर्वादाशिवाय चालू न शकणारा मटका हा व्यवसाय आता चांगलाच हायटेक झाला आहे़ पूर्वीची आकडे घेण्याची पारंपरिक पद्धत, मटक्याचे अड्डे व फोनद्वारे समजणारे ओपन-क्लोज तर केव्हाच बंद झाले़ आता मटक्याचे आकडे हे मोबाइल आणि वेबसाइटवरही बघावयास मिळतात़ आकडे घेणारा राइटर, त्याच्याजवळ असलेले पावतीपुस्तक व पेन या तीनच गोष्टी मटका व्यवसायासाठी आवश्यक असून, शहरातील झोपडपट्ट्या तसेच स्लम भागात सर्रासपणे मटका सुरू आहे़ शहर आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाणे मिळून सुमारे ६५ ठिकाणी हा अवैध व्यवसाय सुरू असून, याद्वारे प्रतिदिन सुमारे ६५-७० लाख रुपयांचा मटका खेळला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे़

65 lakhs 'Matka' is played every day in Nashik | नाशकात दररोज खेळला जातोय ६५ लाखांचा ‘मटका’

नाशकात दररोज खेळला जातोय ६५ लाखांचा ‘मटका’

googlenewsNext
ठळक मुद्दे मटक्याचा हायटेक बाजार : अडीच वर्षांत ६६५ अड्ड्यांवर छापे बिंगोच्या पैसे वसुलीवरून हाणामारी

नाशिक : बेकायदेशीर मात्र विश्वसनीय अन् पोलिसांच्या कृपाशीर्वादाशिवाय चालू न शकणारा मटका हा व्यवसाय आता चांगलाच हायटेक झाला आहे़ पूर्वीची आकडे घेण्याची पारंपरिक पद्धत, मटक्याचे अड्डे व फोनद्वारे समजणारे ओपन-क्लोज तर केव्हाच बंद झाले़ आता मटक्याचे आकडे हे मोबाइल आणि वेबसाइटवरही बघावयास मिळतात़ आकडे घेणारा राइटर, त्याच्याजवळ असलेले पावतीपुस्तक व पेन या तीनच गोष्टी मटका व्यवसायासाठी आवश्यक असून, शहरातील झोपडपट्ट्या तसेच स्लम भागात सर्रासपणे मटका सुरू आहे़ शहर आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाणे मिळून सुमारे ६५ ठिकाणी हा अवैध व्यवसाय सुरू असून, याद्वारे प्रतिदिन सुमारे ६५-७० लाख रुपयांचा मटका खेळला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे़

शहरातील भद्रकाली, रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा ठिकाणी पूर्वी मटक्याचे अड्डे सर्रास सुरू असायचे़ मात्र, पोलिसांच्या सततच्या कारवाईच्या धोरणामुळे पारंपरिक अड्डे बंद झाले आहेत़ मात्र, चोरी-छुपे पद्धतीने मोबाइल व हायटेक साधनांचा वापर करून हा धंदा चांगलाच तेजीत आला आहे़ शहरातील झोपडपट्टी परिसरातील अशिक्षित नागरिक, बांधकाम मजूर, रोजंदारी कामगार, हमाल, रिक्षाचालक, हातगाडी व्यावसायिक अशा खालच्या स्तरातील लोक सर्वाधिकपणे मटका खेळतात़ केवळ एका चिठ्ठीच्या आधारे मटका लागल्यास लाखोंची रक्कम दिली जात असल्याने या व्यवसायातील विश्वासार्हता टिकून आहे़

शहरातील काही मटका खेळणाऱ्यांकडे गत दहा-वीस वर्षांचे मटक्याच्या आकड्यांचे रेकॉर्ड आहे़ याशिवाय जॅकपॉट कुणाला, कधी व किती रुपयांचा लागला, त्यांचा सत्कार कसा झाला हेदेखील त्यांच्या स्मरणात आहे़ मटका खेळणाºयांमध्ये केवळ पुरुषच नव्हे तर स्लम भागातील स्त्रिया व लहान मुलेही मागे नाहीत़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात आजमितीस असलेल्या १३ पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात किमान पाच मटका अड्डे सुरू आहेत़ पोलीस ठाण्यातील पाच अड्ड्यांमध्ये प्रत्येकी लाखाचा मटका खेळला जातो, असे गृहीत धरले तरी प्रतिदिन ही रक्कम ६५ लाख रुपयांपर्यंत पोहोचते़


बिंगो जुगारीतील पैसे वसुलीवरून मारहाण
बिंगो जुगारावर हरलेले व जिंकलेले पैसे देण्याघेण्यावरून गुरुवारी (दि़६) रात्री देवळाली गावात दोन गटांत जबर मारहाण व दगडफेक झाली़ नाशिकरोड पोलीस ठाण्यात याबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, केवळ नाशिकरोड परिसरच नव्हे तर संपूर्ण नाशिक हे बिंगोच्या विळख्यात सापडले आहे़ या जुगारी हरलेले व जिंकलेले पैसे वसुलीसाठी आता मारहाणीच्या घटना घडत असून, काही दिवसांनी खूनही केले जातील़ त्यामुळे पोलिसांनी वेळीच या प्रकारास अटकाव करणे गरजेचे आहे़


दिवसभरात किमान दहा बाजाऱ़़
मटकाकिंग आता हायटेक झाले असून, दिवसभरात मटक्याचे किमान दहा बाजार (ओपन-क्लोजचे) असतात़ टाइम बाजार, कल्याण बाजार, मिलन बाजार, वरळी बाजार व मुंबई मेन बाजार अशा वेगवेगळ्या नावांनी काढले जाणारे आकडे हे पूर्वीसारखे फोनवरून सांगितले जात नाहीत तर मोबाइलवर तसेच ‘मटका सट्टाक़ॉम’ या बेवसाइटवरही पाहता येतात़ शहरातील मटका व्यवसायाची खबर लागली की त्या ठिकाणी छापामारी, गुन्हे दाखल करून बंद केले जातात़ मात्र, आठ-दहा दिवसांनी ते पुन्हा सुरू होतात अर्थात यासाठी पोलिसांचा आशीर्वाद लागतोच़ त्यातच माध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाले की, पोलिसांना द्यावा लागणाºया रकमेत वाढ होते़


मटक्याचे प्रमुख प्रकार व मिळणारी रक्कम !
* सुट्टे घर - १० रुपयाला ९० रुपये
* पट्टा - एक रुपयाला १४० रुपये
* मेट्रो - एक रुपयाला २६० रुपये
* जोड - १० रुपयांना ८० रुपये


अडीच वर्षांत ६६५ अड्ड्यांवर छापे
--------------------------------
सन                    पोलिसांची छापे
--------------------------------
२०१६                     ३०६
२०१७                     २३८
२०१८                     १२१  (जानेवारी ते जुलै)
--------------------------------
एकूण                    ६६५

Web Title: 65 lakhs 'Matka' is played every day in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.