शिक्षक मतदारसंघात  ४६ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:27 AM2017-12-23T00:27:34+5:302017-12-23T00:27:59+5:30

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार नोंदणीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत विभागात ४६,२८५ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे, त्यात नाशिकला सर्वाधिक नोंदणी झाली असली तरी, सहा वर्षांपूर्वीच्या मतदारांपेक्षा यंदा मतदार संख्या घटली आहे.

46 thousand voters in teacher's constituency | शिक्षक मतदारसंघात  ४६ हजार मतदार

शिक्षक मतदारसंघात  ४६ हजार मतदार

Next

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार नोंदणीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत विभागात ४६,२८५ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे, त्यात नाशिकला सर्वाधिक नोंदणी झाली असली तरी, सहा वर्षांपूर्वीच्या मतदारांपेक्षा यंदा मतदार संख्या घटली आहे. विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान सदस्याची मुदत पुढच्या वर्षी जुलै महिन्यात संपुष्टात येत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम आॅक्टोबर महिन्यातच घोषित केला होता. या निवडणुकीसाठी गेल्या सहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली मतदार यादी रद्द ठरविण्यात आल्याने नवीन मतदारांची नोंदणी करणे अपरिहार्य केल्याने त्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. प्रारंभी या नोंदणीकडे शिक्षकांनी पाठ फिरविली नंतर मात्र निवडणूक रिंगणात उतरू इच्छिणाºया उमेदवारांनी पुढाकार घेत शिक्षण संस्थाचालकांकडून मतदारांची नोंदणी करून घेतली. ज्यांनी नावे नोंदविली त्यांची प्रारूप मतदार यादी २१ नोव्हेंबर रोजी आयोगाने जाहीर केली असून, या यादीवर हरकती, सूचना मागविण्याबरोबरच २१ डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणीची मुदत देण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यात विभागात ४६,२८५ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. त्यात नाशिकला सर्वाधिक म्हणजेच १२,३२८ अहमदनगर-११,६१९, धुळे-७४२४ व नंदुरबार ५०३६ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक पुरुष शिक्षकांची ३५,५६६, तर महिला मतदारांची संख्या १०७०९ आहे. या मतदारसंघाची अंतिम मतदार यादी १० जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 
मुदतवाढ मिळण्याची शक्यता 
सहा वर्षांपूर्वी या मतदारसंघात नवीन मतदार यादी तयार करण्यात आली असता, विभागातून सुमारे ५३ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यंदा मात्र त्यात सहा हजारांनी घट झाली आहे. साधारणत: जुलै महिन्याच्या पूर्वी या मतदारसंघात मतदान होणार असल्याने तत्पूर्वी आणखी एक टप्पा मतदार नोंदणीचा होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मतदार नोेंदणीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणीही केली जात आहे.

Web Title: 46 thousand voters in teacher's constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.