आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी ३७२ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 09:08 PM2017-12-08T21:08:56+5:302017-12-08T21:33:28+5:30

372 nomination papers for different authorities of the University of Health Sciences | आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी ३७२ उमेदवारी अर्ज

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी ३७२ उमेदवारी अर्ज

Next
ठळक मुद्देनागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद विभागीय केंद्रांवर अर्ज करण्याची व्यवस्था११ रोजी विद्यापीठ मुख्यालयात अर्जांची छाननी२८ डिसेंबर रोजी मतदान, ३० डिसेंबर रोजी मतमोजणी


नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी एकूण ३७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यासमंडळासाठी होणाºया निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद विभागीय केंद्रांवरदेखील अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथील अर्ज एकत्रित केल्यानंतर एकूण उमेदवारांच्या अर्जांची संख्या ३७२ झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले. अधिसभेसाठी प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे सहा जागांसाठी ६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विद्या परिषदेसाठी वैद्यकीय,दंत,आयुर्वेद आणि तत्सम विद्याशाखेतील प्रत्येकी एक याप्रमाणे पाच प्राचार्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. वैद्यकीय विद्याशाखा महिला, तर दंत विद्याशाखा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
अभ्यासमंडळाच्या जागांसाठी ३०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये वैद्यकीय विद्याशाखेसाठी ५५, दंत विद्याशाखा ४४, आयुर्वेद १२५, युनानी ६, तर होमिओपॅथीसाठी ३४ आणि तत्सम विद्याशाखेसाठी ४० उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.
येत्या ११ रोजी विद्यापीठ मुख्यालयात अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध अर्जांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत २० डिसेंबर इतकी आहे. २८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३० डिसेंबर रोजी मतमोजणी विद्यापीठाच्या मुख्यालयातच होणार आहे.

Web Title: 372 nomination papers for different authorities of the University of Health Sciences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.