२० हजार क्विंटल कांद्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:12 AM2017-10-07T01:12:14+5:302017-10-07T01:13:55+5:30

येथे शुक्रवारी कांद्याला किमान हजार रुपये, कमाल २२५०, तर सरासरी १९५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर अंदरसूल उपबाजारात किमान ७०० रुपये, कमाल २३२४ तर सरासरी १९५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

20 thousand quintals of onion arrivals | २० हजार क्विंटल कांद्याची आवक

२० हजार क्विंटल कांद्याची आवक

Next

येवला : येथे शुक्रवारी कांद्याला किमान हजार रुपये, कमाल २२५०, तर सरासरी १९५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर अंदरसूल उपबाजारात किमान ७०० रुपये, कमाल २३२४ तर सरासरी १९५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. आवकेत वाढ सुरूच असून, दोन्ही ठिकाणी हजार ट्रॅक्टर आणि १८५ रिक्षांमधून सुमारे २० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कांद्याची आवक वाढली आहे.
आगामी १६ आॅक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने इतर सुट्यावगळता केवळ नऊ दिवस कांदा मार्केट चालू राहणार आहे. चाळीत शिल्लक असलेला किमान दोन लाख क्विंटल कांद्यापैकी आगामी नऊ दिवसात किमान दीड लाख क्विंटल कांदा मार्केटला येण्याची शक्यता आहे. कांद्याचे बाजारदेखील २०० ते ५०० रुपयांनी वाढण्याची शेतकºयांना आशा आहे.
कांदा खाणार भाव
उमराणा, मनमाड, चांदवड या डोंगराळ भागातील नवीन लाल कांदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येऊ लागला की, उन्हाळ कांद्याचा भाव खाणे बंद होते. त्यानंतर लागलीच १५ नोव्हेंबरपासून येवला, वैजापूर, नांदगाव या भागातील नवीन लाल पोळ कांदा बाजारात येतो. सध्या मार्केटमध्ये असलेला गावरान कांदा केवळ महिनाभर भाव खाणार आहे. सध्या येवला बाजार समितीच्या आवारात सध्या मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. कांदा चाळीत साठवलेला कांदा आता खराब होऊ लागला आहे. त्यामुळे आता शेतकरी मार्केटला कांदा आणण्याची घाई करीत आहेत.
दिवाळीनंतर शेतकºयांच्या चाळीत शिल्लक राहिलेला ५० हजार क्विंटल कांदा दिवाळीनंतर मार्केटमध्ये येईल. त्या दरम्यान कांद्याचा तुटवडा भासण्याची स्थिती राहील, त्यामुळे किमान ५०० ते ७०० रु पये क्विंटने भाव वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Web Title: 20 thousand quintals of onion arrivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.