नाशिक-औरंगाबाद महामार्गावर टँकरची शिवशाही बसला धडक, अनेक प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 15:31 IST2018-09-15T15:30:32+5:302018-09-15T15:31:23+5:30
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर टँकरची शिवशाही बसला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे.

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर टँकरची शिवशाही बसला धडक, अनेक प्रवासी जखमी
नाशिक - नाशिक-औरंगाबाद महामार्गावर टँकरची शिवशाही बसला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकहून औरंगाबादकडे जाणारी शिवशाही बस विंचूर एमआयडीसीजवळ पलटी झाली.
नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या डिझेल टँकरचा टायर फुटल्याने त्याची शिवशाही बसला जोरदार धडक बसली. जखमींना उपचारासाठी निफाड आणि नाशिक येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.