14,546 मतदारांनी वापरला नकाराधिकार

By admin | Published: May 27, 2017 01:05 AM2017-05-27T01:05:12+5:302017-05-27T01:05:24+5:30

मालेगाव : नगरसेवकांच्या कामगिरीवर नाराज असलेल्या १४ हजार ५४६ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला.

14,546 voters used to decline | 14,546 मतदारांनी वापरला नकाराधिकार

14,546 मतदारांनी वापरला नकाराधिकार

Next

 शफीक शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : एकीकडे प्रशासन निवडणुकीत मतदान मोठ्या संख्येने व्हावे यासाठी प्रयत्न करीत असताना नगरसेवकांच्या कामगिरीवर नाराज असलेल्या शहरातील सुमारे १४ हजार ५४६ मतदारांनी आपला नकाराधिकाराचा वापर केला.
मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. काही प्रभागातल्या उमेदवारांनी आणि पक्षांनीही मतदारांना विविध ‘प्रलोभने’ दाखवून मत देण्यासाठी आर्जव केले; मात्र बहुतांश सुजाण सुशिक्षित असलेल्या मतदारात आपापल्या प्रभागात उभ्या असलेल्या ‘उमेदवारां’बाबत चक्क नाराजी व्यक्त केली. काही प्रभागात उमेदवारांनी आपण काम न केल्यास आपल्यावर गुन्हे दाखल करावेत, असे शपथपत्र सादर केले असले तरी त्याचाही काही एक उपयोग झालेला नाही. मतदारांनी नकाराधिकाराचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, निवडणुकीसाठी मैदानात उमेदवार उतरविणाऱ्या राजकीय पक्षांपुढे विचार करायला लावणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे नकाराधिकार वापरणाऱ्यांची संख्या अशीच वाढत गेल्यास पक्षाच्या प्रमुखांनाही उमेदवारी देताना ‘कठोर’ निकष लावावे लागणार आहेत.
प्रभाग १० मधील (अ) गटात १५७, (ब) गटात २००, (क) गटात १३५ तर (ड) गटात १३२ मतदारांनी नकाराधिकार वापरला आहे.
प्रभाग १ मधील (अ) गटात १७०, (ब) गटात ३४३, (क) गटात १४८ तर (ड) गटात १६८ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला. प्रभाग २ मधील (अ) गटात ७६, (ब) गटात ३१०, (क) गटात २३३ तर (ड) गटात ११२ मतदारांनी उमेदवारांविषयी नापसंती व्यक्त करीत नकाराधिकार वापरला. प्रभाग ३ मधील (अ) गटात १०९, (ब) गटात १८३, (क) गटात ८० तर (ड) गटात १७८ जणांनी नकाराधिकार वापरला. प्रभाग ४ मधील (अ) गटात १००, (ब) गटात १८१ (क) गटात १३२ तर (ड) गटात ९९ मतदारांनी कुणालाही पसंती देणे टाळले.
प्रभाग ५ मधील (अ) गटात ९४, (ब) गटात १८२, (क) गटात १२० तर (ड) गटात १९४ मतदारांनी नकाराधिकार वापरला. प्रभाग ६ मध्ये (अ) गटात ११५, (ब) गटात २१०, (क) गटात १४२ तर (ड) गटात ११५ मतदारांनी कोणत्या मतदारांना मतदान केले नाही. प्रभाग ७ मध्ये (अ) गटात १५९, (ब) गटात १८३, (क) गटात ८९ तर (ड) गटात ८८ मतदारांनी आपल्या नकाराधिकाराचा वापर केला. प्रभाग १४ मधील (अ) गटात २१८, (ब) गटात २२२ (क) गटात ८९ तर (ड) गटात २१६ मतदारांनी नकाराधिकाराचा वापरला.
प्रभाग १८ मधील (अ) गटात ७१, (ब) गटात १२१ (क) गटात १०६ तर (ड) गटात ९८ मतदारांनी तर प्रभाग २० मधील (अ) गटात ५९, (ब) गटात ८९ (क) गटात २६८ आणि (ड) गटात ७० मतदारांनी आपल्या नकाराधिकाराचा वापर केला आहे. प्रभाग २१ मधील (अ) गटात १४२ (ब) गटात २७५ (क) गटात ७९ तर (ड) गटात २०७ मतदारांनी नकाराधिकार वारपला.

Web Title: 14,546 voters used to decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.