वीज तारांमुळे तळोदेकरांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:17 PM2018-05-27T13:17:48+5:302018-05-27T13:17:48+5:30

वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष : एकाचा बळी गेल्यानंतरही सुधारणा नाही

Talode's life threatens due to electricity tariffs | वीज तारांमुळे तळोदेकरांचा जीव धोक्यात

वीज तारांमुळे तळोदेकरांचा जीव धोक्यात

Next

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 27 : वीज वितरण कंपनीच्या हायटेन्शन लाईंनने शहरातील काही भागातील इमारतींना अक्षरश: स्पर्श केला असल्याचे चित्र दिसून येत असून, येथील रहिवाशी जीव मुठीत घेवून वावरत आहेत. याबाबत तेथील  नागरिकांनी सातत्याने वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांकडे तक्रारी करूनही त्या तारा हटविण्याबाबत साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या तारांमुळे आधीच एकाचा जीव गेला आहे. अजून आणखीन बळी जाण्याची वाट कंपनी अधिकारी पाहात आहे का? असा संतप्त प्रश्न संबंधित रहिवाशांनी उपस्थित केला आहे. निदान वरिष्ठ प्रशासनांनी तरी याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरातील ग्राहकांच्या वीजपुरवठय़ासाठी तलावडी जवळील 133 के.व्ही. उपकेंद्रातून वीजपुरवठा जोडण्यात आला आहे. याशिवाय तहसील परिसर, साकरलालनगर, विमलनगर, भोईवाडा, कुंभारवाडा, कॉलेज रस्ता, या भागातून वीज कंपनीची हायटेन्शन लाईनदेखील गेली आहे. परंतु या लाईनच्या तारा प्रचंड लोंबकळल्या आहेत. त्या अक्षरश: या भागातील इमारतींना स्पर्श करीत असल्याचे चित्र आहे. 
साहजिकच हे रहिवाशी छपरावर, स्लॅबवर चढतांना आपला जीव मुठीत घेवून वावरत आहेत. हवेमुळे अथवा झाडांच्या फांद्यामुळे तारा एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा मोठ-मोठय़ा चिंग्या उडत असतात. त्याचबरोबर शॉर्टसर्कीटमुळे वीजेची उपकरणेदेखील सतत जळण्याचा प्रकार घडत असतो. विशेष म्हणजे तहसीलरोड कडील भागात तर तारांचे विदारक चित्र आहे. 
या भागात सर्वच शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे कामकाजासाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. दुर्घटनेची शक्यता नाकारता येणार नाही. आधीच तीन-चार वर्षापूर्वी या भागातच एकाचा जीव तारांना स्पर्श झाल्यामुळे गेला होता. तरीही वीज वितरण कंपनीने अजूनही तारा हटविलेल्या नाहीत. वास्तविक येथील रहिवाशांनी हायटेन्शन लाईन हटविण्यासाठी कंपनीच्या संबंधित कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या उपरांत कंपनीच्या अधिका:यांना प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले आहे. संबंधीत अधिका:यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला आहे. प्रस्तावदेखील पाठविला आहे, असे वायदे देत असल्याचे नागरिक सांगतात. वास्तविक ही एल.एन.की. लाईन आहे. तिचा प्रवाहदेखील 11 हजार होल्टचा असतो. साहजिकच सावधानता बाळगण्याची आवश्यकता असतांना वीज कंपनीने रहिवाशांच्या सुरक्षिततेकडे उदासिन धोरण घेतले आहे. 
एवढेच नव्हे तेथे ब्रॅकेट बसविण्याची तसदीदेखील घ्यायला तयार नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. निदान वरिष्ठ प्रशासनाने तरी याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची रहिवाशांची मागणी आहे.
 

Web Title: Talode's life threatens due to electricity tariffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.