तळोद्यात वटवाघळांच्या अचानक मृत्यूने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:57 PM2018-05-29T12:57:42+5:302018-05-29T12:57:42+5:30

तळोद्यातील प्रकार : पशुसंवर्धन विभागाकडून दखल, अनेक पिले कुजलेल्या अवस्थेत

Sudden death sensation in Paltod | तळोद्यात वटवाघळांच्या अचानक मृत्यूने खळबळ

तळोद्यात वटवाघळांच्या अचानक मृत्यूने खळबळ

Next

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 29 : शहराजवळील मिशन बंगल्याच्या प्रांगणातील झाडाखाली अचानक वटवाघुळांची आठ ते दहा पिल्ली मरून पडल्याचे सोमवारी सकाळी दिसून आले. ही घटना संबंधित वनविभाला कळविल्यानंतर या विभागाचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर या मृत पक्ष्यांना तेथेच पुरण्यात आले. निपाह रोगाच्या पाश्र्वभूमिवर सुसज्ज तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु लहान मुलांनी गिलोडने या पक्ष्यांना मारल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. तथापि असे वटवाघूळ अचानक झाडाखाली मरून पडले तर तातडीने पशुसंवर्धन अथवा वनविभागास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहराजवळ मिशन बंगला आहे. या बंगल्यातील सुपारीच्या झाडाखाली वटवाघुळाची आठ ते दहा पिल्ले अचानक मरून पडलेली होती. नुकताच निपाह या भयानक रोगाच्या पाश्र्वभूमिवर नागरिकांमध्येही भितीचे वातावरण आहे. या बंगल्याकडे जाणा:या एकास वटवाघुळाची ही मेलेली पिल्ले दिसून आली. त्यांनी सरळ वनविभागाकडे संपर्क केला. वनविभागाने तातडीने दखल घेत सहायक उपवनसंरक्षक संजय             अहिरे, हेमंत शेवाळे, वनक्षेत्रापाल नीलेश रोहडे, वनक्षेत्रपाल                    राजेंद्र वायकर, संजय वाणी, सतीष कुवर व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे हे घटनास्थळी दाखल झाले. या वेळी त्यांनाही ही पिल्ले मृतावस्थेत दिसून आले होते. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. सर्व जागेची पाहणी केली होती. या घटनेबाबत तेथील रहिवाशांना अधिका:यांनी विचारले असता या ठिकाणी सुपारीच्या झाडात वटवाघुळाचे मोठे वास्तव्य आहे. शिवाय त्याचा मोठा कळपदेखील आहे. लहान मुलांनी गिलोडने त्यांना मारल्याचे सांगितले.
पंचनाम्यानंतर या वटवाघुळांच्या पिल्लांना जवळच खड्डा करून तेथे पुरण्यात आले. याशिवाय त्यांच्या पडलेल्या विष्ठेवरदेखील चुना टाकण्यात आला होता. निपाह या संसर्ग रोगाच्या पाश्र्वभूमीवर या मृतपिल्लांना पुणे येथील              फॉरेन्सीक प्रयोग शाळेत पाठविण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे यांनी वरिष्ठ अधिका:यांशी संपर्क करून बर्फ व खोक्याची   पँकींग यासह सुसज्ज तयारी करून आले होते. मात्र सदर पिले ही कुजलेली आढळून आल्याने त्यांना तेथेच पुरण्यात आले. अन् शेवटी           या दोन्ही यंत्रणांच्या अधिका:यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तरीही खबरदारी म्हणून कुठे वटवाघुळ मेलेल्या स्थितीत आढळून आले तर या विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title: Sudden death sensation in Paltod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.