कला शाखेला यंदाही विद्यार्थी अन पालकांची ‘ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:05 PM2019-07-16T13:05:53+5:302019-07-16T13:05:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचे सुरु झालेले मिशन अॅडमिशन संपुष्टात आले आह़े पालकांच्या आग्रहाने ...

Students of 'Ankha' | कला शाखेला यंदाही विद्यार्थी अन पालकांची ‘ना’

कला शाखेला यंदाही विद्यार्थी अन पालकांची ‘ना’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचे सुरु झालेले मिशन अॅडमिशन संपुष्टात आले आह़े पालकांच्या आग्रहाने विद्याथ्र्यानी विज्ञान शाखेची कास धरल्याने  कला शाखेच्या किमान 40 टक्के जागा रिक्तच असल्याची स्थिती यंदाही राहणार आह़े 
जिल्ह्यात मार्च 2019 मध्ये 19 हजार 935 विद्याथ्र्यानी दहावीची परीक्षा दिली होती़ जून महिन्यात जाहिर करण्यात आलेल्या निकालात  14 हजार 840 विद्याथ्र्यानी यश प्राप्त केले होत़े यात 7 हजार 445 मुले तर 9 हजार 235 मुली उत्तीर्ण झाल्या होत्या़ उत्तीर्ण झालेल्या झालेल्या 14 हजार विद्याथ्र्यासाठी जिल्ह्यातील 76 कनिष्ठ महाविद्यालयात अनुदानित व विनाअनुदानित तुकडय़ांमधून 16 हजार 320 जागांसाठी गेल्या महिनाभरापासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली होती़ यांतर्गत गेल्या महिनाभरात विज्ञान, वाणिज्य आणि संयुक्त शाखेच्या 100 टक्के जागा भरल्या गेल्या असून कला शाखेच्या 50 टक्के जागा रिक्त आहेत़ 17 जुलै रोजी प्रवेशाची मुदत संपत असल्याने गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही कला शाखेतील निम्मी पदे रिक्त राहण्याची शक्यता आह़े 
जिल्ह्यात 53 अनुदानित, 17 विनाअनुदानित तसेच 6 स्वयं अर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालये आहेत़ याठिकाणी गेल्या वर्षी कला शाखेच्या आठ हजार, विज्ञान 6 हजार 800, वाणिज्य 680 तर संयुक्त शाखेच्या 440 जागा करुन देण्यात आल्या होत्या़ यात सर्व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या 7 हजार 2 जागा भरल्या गेल्या होत्या़ अकरावी विज्ञान शाखेसाठी 110 टक्के प्रवेश झाले होत़े याउलट आठ हजार जागा असलेल्या कला शाखेला गेल्या वर्षी केवळ 5 हजार 253 विद्यार्थी भेटले होत़े अनुदानित महाविद्यालयात 4 हजार 341 तर विनाअनुदानित 832 तर स्वयंअर्थसहाय्यित महाविद्यालयात केवळ 80 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होत़े महाविद्यालयस्तरावर विद्यार्थी प्रवेश करुन घेण्यासाठी शिक्षकांची सध्या जोरदार धावपळ सुरु आह़े यंदा शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी 77 कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु आह़े यासाठी एकूण 190 तुकडय़ांना मान्यता देण्यात आली असून कला, विज्ञान, वाणिज्य आणि संयुक्त शाखेत एकूण 16 हजार 320 विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत़ यात कला शाखेच्या आठ हजारपैकी 4 हजार जागा भरल्या गेल्या असल्याने उर्वरित जागांसाठी महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापक विद्यार्थी पालकांची मनधरणी करत असल्याचे चित्र आह़े 

Web Title: Students of 'Ankha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.