Sexual Harassment on a minor girl in Kopheri in Nandurbar taluka | नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील कोपर्ली येथे 15 वर्षीय युवतीवर एकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आह़े जीवे ठार मारण्याची धमकी देत युवतीवर अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े  
दहिंदुले येथील सैलू हिरामण भिल हा 30 डिसेंबर रोजी कोपर्ली येथे गेला होता़ याठिकाणी त्याने रात्री 8़40 वाजेच्या सुमारास घराकडे एकटय़ा जाणा:या 15 वर्ष आठ महिने वयाच्या अल्पवयीन युवतीला थांबवत तिला मधू सहादू भिल यांच्या गुरे बांधण्याच्या गोठय़ात नेल़े याठिकाणी सैलू याने पिडित युवतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्या जबरदस्ती करून बलात्कार केला़ या घटनेची माहिती युवतीने घरी आल्यानंतर दिल्यावर तिच्या कुटूंबियांनी सोमवारी सायंकाळी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत, हा प्रकार कथन केला़ पिडित युवतीच्या वडिलांनी तालुका पोलीस दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सैलू हिरामण भिल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक गितांजली सानप तपास करत आहेत़ पिडितेवर अत्याचार करणारा सैलू भिल याचे कोपर्ली येथील त्याच्या मामाकडे कायम ये-जा सुरू असत़े 30 डिसेंबर रोजीही तो कोपर्ली येथे आला होता़ गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयित सैलू याचा पोलीस शोध घेत असून पिडित युवतीची वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रूग्णालयात करण्यात आली आह़े 


Web Title: Sexual Harassment on a minor girl in Kopheri in Nandurbar taluka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.