जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:25 PM2019-07-21T12:25:49+5:302019-07-21T12:26:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान ...

Rain in the district everywhere | जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान पिकांच्या वाढीसाठी व दुबार पेरणी टाळण्यासाठी अजून पावसाची आवश्यकता आहे.
शहादा
शहाद्यात शुक्रवारी रात्री 10 वाजता पावसाला सुरुवात झाली. तासभर चाललेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मोठय़ा प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावल्याचे दिसून येत आहे. दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी अजूनही शहादेकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा अजूनही नद्या, नाल्यांना पूर आला नसल्याने पाणीटंचाईची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र आहे.
हळदाणी
नवापूर तालुक्यातील हळदाणीसह मासलीपाडा परिसरात शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना त्याचा फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाने विजांच्या गडगडाटासह आलेल्या एक तास चाललेल्या पावसामुळे समाधान व्यक्त केले. मात्र काही परिसरात तुरळक पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. परंतु परिसरातील नदी नाल्यांना अद्यापर्पयत पूर आला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
नवापूर
नवापूर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही जटील राहीला आहे. या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मका व ज्वारी यासह खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. 

रांझणी परिसरात पावसाची हुलकावणी
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, पावसाचे वातावरण तयार होऊनही पाऊस बरसत नसल्याने शेतक:यांची निराशा होत आहे. शक्रवारी रात्री जोदार वा:यासह विजांचा कडकडाट परिसरात होत होता. परंतु प्रत्यक्षात पावसाला सुरुवात झाली नाही. शनिवारी दिवसर चांगले तापमान होत
े. मात्र वारा बंद झाल्याने एकदाची पावसाला कधी सुरुवात होते याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. परंतु प्रत्यक्षात पाच ते दहा मिनिट पावसाच्या बारीक सरी पडल्याने या परिसरात पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतक:यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान कापूस, ज्वारीसह मका व सोयाबीन सारख्या पिकांसाठी पाऊस अत्यावश्यक आहे.
 

Web Title: Rain in the district everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.