तळोदा व धडगाव तालुक्यात अॅनिमेशनद्वारे महिलांमध्ये जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:54 PM2018-03-21T12:54:59+5:302018-03-21T12:54:59+5:30

बालमृत्यू रोखण्यासाठी उपाय : तळोदा व धडगाव तालुक्यात पाच हजार गर्भवती महिलांची नोंदणी

Public awareness among women through the animation in Taloda and Dhadgaon taluka | तळोदा व धडगाव तालुक्यात अॅनिमेशनद्वारे महिलांमध्ये जनजागृती

तळोदा व धडगाव तालुक्यात अॅनिमेशनद्वारे महिलांमध्ये जनजागृती

Next

लोकमत ऑनलाईन
तळोदा, दि़ 21 : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी टॅबलेटच्या माध्यमातून अॅनिमेशनद्वारे महिलांमध्ये जनजागृती केली जात आहे. आतापावेतो तळोदा व धडगाव तालुक्यातील पाच हजार 348 गरोदर माता व एक हजार 500 बाळांची नोंदणी करण्यात आली आहे. यातील दोन हजार 338 महिला, 232 बाळांना सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. यासाठी वित्तिय सहाय्यता टाटा ट्रस्टकडून संस्थेला पुरविली जात  आहे. 
यात शासनाचा निधी नसला तरी शासनाच्या सहकार्यातून हे मिशन राबविले जात आहे. सातपुडय़ातील वाढलेले बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी या संस्थेस टाटा ट्रस्टने अर्थसहाय्य दिले आहे. प्रायोगिक तत्वावर संस्थेने तळोदा व धडगाव ही तालुके घेतली आहेत.
यात 151 गावांचा समावेश करण्यात आला आहे. योग्य जोडपे, गर्भवती माता आणि बाळ यांची नोंदणी मोबाईल अॅमध्ये करण्यात येवून त्यानंतर टॅबलेटच्या माध्यमातून अॅनिमेशनद्वारे या महिलांना मार्गदर्शनाबरोबरच जागृती केली जात आहे. बालसंगोपन, लसीकरण, नियोजन, अनेमिया, स्तनपान, उच्चधोकादायक  आरोग्याची चिन्हे, संस्थात्मक प्रसुती, डायरीया, एचआयव्ही एड्स याबाबत महिलांचे समुपदेशन केले जात असून, त्यांना आरोग्य सुविधाही पुरविण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापावेतो पाच हजार 348           गरोदर माता, एक हजार 491 बालकांची नोंदणी करण्यात आली आहे. यातून दोन हजार 338 महिला   व 232 बालकांवर योग्य उपचार सुरू आहे. यासाठी सदर संस्था दोन्ही तालुक्यातील आरोग्य यंत्रणांचे सहकार्य घेत आहे. संबंधीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील नर्सच्या मदतीने संस्था हे मिशन राबवित आहे. टॅबवरील अॅनिमेशनच्या चित्रांमुळे महिलांना माहिती लवकर समजते. त्यामुळे महिलांचा  प्रतिसादही उत्स्फूर्तपणे मिळत असल्याचे सांगण्यात आले. परिणामी निश्चितच या दोन तालुक्यातील माता-पालक मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. 
हे मिशन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सीओ काळे परेश, प्रकल्प व्यवस्थापक आशिष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक नीलचंद्र शेंडे व त्यांची टीम मेहनत घेत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील बाल-माता मृत्यू कमी करण्यासाठी संस्थेने मोबाईल टॅबवर एम खुषहाली हे अॅप तयार केले आहे. यात अॅनिमेशनचा डाटा लोड करण्यात आला आहे. त्यामुळे अॅनिमेशनद्वारे महिलांना मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर या अॅपमुळे महिलांना आरोग्याची माहिती देणे सोपे होते. महिलाही उत्सुकतेने सहभागी होतात. अॅपमध्ये नोंदणी केलेल्या माता व बालकांची संपूर्ण आरोग्याची माहिती संकलीत होत असल्याने प्रत्येक आरोग्य यंत्रणेला समजते. त्यावरून अचूक मूल्यमापन अन वेिषण करण्यात येवून योग्य औषधोपचार केला जातो. शिवाय एमला देखील एसएमएसद्वारे रुग्णावरील उपचार सूचित करता येतो. सर्वरच्या मदतीने डॅशबोर्डवर माहिती नर्सला पाठविण्यात येत असल्यामुळे जोखमीच्या माता ओळखल्या जावू शकतात. अपेक्षीत प्रसुती तारीख तसेच कृती आराखडा, दरमहा भेटी, भेटीचे नियोजन कार्यबद्ध स्वरूपात करता येते. यासाठी या दोन्ही तालुक्यातील 37 नर्स सेविकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना टॅबदेखील पुरविण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा प्रशासन यावर वॉच ठेवून आहेत.
 

Web Title: Public awareness among women through the animation in Taloda and Dhadgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.