गुरांसाठी 5 लाख मेट्रीक टन चा_याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:07 PM2018-11-15T13:07:40+5:302018-11-15T13:07:47+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील यंदा चार तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे प्रशासनाने उपाययोजनांना वेग दिला आह़े एकूण सहा लाख 97 ...

Planning of 5 lakh metric tonne for cattle | गुरांसाठी 5 लाख मेट्रीक टन चा_याचे नियोजन

गुरांसाठी 5 लाख मेट्रीक टन चा_याचे नियोजन

Next

नंदुरबार : जिल्ह्यातील यंदा चार तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे प्रशासनाने उपाययोजनांना वेग दिला आह़े एकूण सहा लाख 97 हजार पशुधनासाठी प्रशासनाकडून पाच लाख 68 हजार मेट्रिक टन चा:याचे नियोजन करण्यात आले असून यातील चार लाख 55 हजार मेट्रिक टन चारा हा खरीप हंगामात उपलब्ध झाल्याने एप्रिल 2019 र्पयत प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आह़े 
नंदुरबार जिल्ह्यातील गुजरातसह लगतच्या धुळे जिल्ह्यात चारा वाहतूक होऊन चारा टंचाई निर्माण होत असल्याचा पूर्वानुभव असल्याने प्रशासनाने यंदा दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्याबाहेरील चारा वाहतूकीवर बंदी घातली आह़े यातून काहीअंशी प्रशासनाला यश आले असले तरी चारा नियोजनाच्या प्रमुख मुद्दय़ांवर सध्या कामकाज सुरु करण्यात आले आह़े यांतर्गत पशुसंवर्धन विभागाने गेल्या वर्षात जिल्ह्यातील विविध भागात लाभार्थीना वाटप केलेल्या 563 किलो न्यूट्रीफिड चारा बियाणे वाटप केले होत़े यातून खरीप हंगामात 7 हजार 37 हजार मेट्रीक टन चा:याची निर्मिती करण्यात आली होती़ यासोबतच खरीपातील मका, ज्वारी, बाजरी या पिकांचा 4 लाख 48 हजार 510 मेट्रिक टन कडबा शेतक:यांकडे अद्याप शिल्लक आह़े तूर्तास एकूण पाच लाख 55 हजार मेट्रिक टन चारा शिल्लक असल्याने शेतक:यांनी सुटकेचा निश्वास सोडला आह़े यातही वाटप करण्यात आलेल्या 563 किलो न्यूट्रीफिड बियाण्यातून दोन ते तीन वेळा चारा कापणी होणार असल्याने अनेकांच्या गुरांचा चा:याचा प्रश्न मार्गी लागला आह़े नंदुरबार जिल्ह्यात 3 लाख 15 हजार 334 गायी, म्हैस, बैल असे मोठे तर 93 हजार 783 लहान गुरे आहेत़ यासोबतच दोन लाख 72 हजार 753 शेळ्या आणि 15 हजार 276 मेंढय़ा आहेत़ या सर्व पशुधनासाठी पाच 55 हजार मेट्रीक टन चारा पुरेसा ठरणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आह़े जिल्ह्यात यंदा चारा नियोजन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हा परिषदेच्या 85 आणि शासनाच्या 19 अशा एकूण 104 पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या माध्यमातून चारा नियोजन प्रशिक्षण कार्यक्रम येत्या महिन्यापासून सुरु करण्यात येणार आह़े यातून शेतक:यांना चारा लागवड करण्यासोबतच चा:याची कुट्टी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आह़े एकीकडे चा:याचे हे नियोजन सुरु असताना सर्व सहा तालुक्यात चारा निर्मितीवर भर देण्याची पशुसंवर्धन विभागाची योजना आह़े यातून 1 हजार 83 किलो न्यूट्रीफिड चारा बियाणे वाटप करुन त्यातून 40 दिवसात 25 हजार मेट्रिक टन चारा निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार आह़ेविभागाकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत वैरण पिकांचे बियाणे आणि खतांचे वितरण करण्यात येणार आह़े यात नंदुरबार 1 हजार 387, नवापूर 1 हजार 408, शहादा 1 हजार 350 तर तळोदा तालुक्यातील 871 शेतक:यांचा समावेश आह़े विभागाकडे अर्ज करणा:या शेतक:यांना अफ्रिकन टॉल वाणाचा मका, मालदांडी, फुले रुचिरा आणि पिकेव्ही क्रांती या वाणाचे ज्वारी बियाणे देण्यात येणार आह़े शेतक:यांना प्रती 10 गुंठय़ाकरिता 460 रूपयांचा निधी देण्याची ही योजना आह़े यातून किमान 26 हजार मेट्रीक टन चारा निर्मिती होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 
पशुसंवर्धन विभागाने राबवलेल्या विविध योजनांद्वारे तब्बल साडेपाच लाख मेट्रिक टन चारा निर्मिती करण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्याची तयारी संबधित विभागाने दर्शवली आह़े तूर्तास नवापूर आणि नंदुरबार तालुक्यातील काही गावांमध्ये मका आणि ज्वारीचा ओला चारा शेतशिवारात दिसून येत आह़े यातून शेतक:यांना दुहेरी लाभ होत आह़े 
पशुसंवर्धन विभागाकडून वाटप होणारा न्यूट्रीफीड बियाण्याचा शेतक:यांना दुहेरी लाभ आह़े लागवडीनंतर 40 दिवसात उत्पादन येणा:या न्यूट्रीफीड गवताचा चारा हा गुरांसाठी पोषक मानला जातो़ जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने वाटप केलेल्या 563 किलोग्रॅम बियाण्यातून साडेतीन हजार हेक्टरवर हा चारा फुलवण्यात शेतक:यांना यश आले होत़े विशेष म्हणजे हा चारा नंदुरबार, शहादा आणि नवापूर या तीन दुष्काळी तालुक्यात आला आह़े कमी पाण्यावर निर्माण होणारे न्यूट्रीफिड गवत एकदा कापल्यानंतर पुन्हा उगवत असल्याने शेतक:यांना लाभ झाला आह़े साधारण 80 दिवसात दोन वेळा या चा:यातून शेतक:यांना लाभ होत असल्याची माहिती शेतक:यांकडून  देण्यात आली आह़े 

Web Title: Planning of 5 lakh metric tonne for cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.