जिल्ह्यात पावसाची संततधार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:59 AM2017-07-28T00:59:49+5:302017-07-28T01:03:16+5:30

   शहाद्यात शेतीपिकांचे नुकसान : पाणीपातळीत वाढ, कुढावदला घर जमीनदोस्त, जीवितहानी टळली

nandurbar heavy rain fall | जिल्ह्यात पावसाची संततधार कायम

जिल्ह्यात पावसाची संततधार कायम

Next
ठळक मुद्देपावसाची रिपरिप कायमसंततधार पावसाने कुढावद येथे घर कोसळलेब्राह्मणपुरीत शेतांमध्ये साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार शहरासह जिल्ह्यात सर्वत्र गुरुवारी पावसाची रिपरिप कायम होती़ पावसाच्या संततधारेने शहरी तसेच ग्रामीण भागातील जनजीवनही काहीसे विस्कळीत झाले होते़ 
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात   अक्कलकुवा, शहादा, तळोदा, नवापूर नंदुरबार तालुका आदी ठिकाणी पावसाची संततधार कायम आहे़ त्यामुळे शेतकºयांमध्येही आनंदाचे वातावरण आहे़ संततधार पावसामुळे शेतकºयांंची पिके तरली असली                तरी बहुसंख्य ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसानदेखील झाले असल्याची स्थिती आहे़ शहादा तालुक्यातील बहुसंख्य शेतशिवारात पाणी साचले आहे़

संततधार पावसाने कुढावद येथे घर कोसळले
शहादा तालुक्यातील कुढावद येथे गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे मोठ्या संख्येने घरांची पडझड सुरू आहे़ अतिपावसामुळे कुढावद येथील सखाराम दगडू बोराणे यांचे घर कोसळले आहे़ सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही़ परंतु यात त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे़ 
घरातील संसारोपयोगी वस्तू घराच्या ढिगाºयाखाली दबल्या गेल्याने भरपावसात त्यांचा संसार उघड्यावर आला आहे़ ज्या वेळी त्यांचे घर कोसळले त्या वेळी ते पूजेनिमित्त मंदिरात गेले होेते़ त्यामुळे मोठी दुर्घटना टळली़ या घटनेत आर्थिक नुकसान झाले असल्याने शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बोराणे यांच्याकडून करण्यात येत आहे़ 
या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने अनेक  घरे कोसळण्याच्या प्रकारात वाढ होत आहे़ अनेक भागातील घरांना तडे जात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ 

 

 

Web Title: nandurbar heavy rain fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.