नगरसेविक पूत्राच्या राडय़ाचे पालिका सभेत पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 09:35 PM2019-07-18T21:35:27+5:302019-07-18T21:35:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मंगळवारी पालिकेत झालेल्या तोडफोड प्रकरणी नगराध्यक्षांनी निषेध नोंदविण्याच्या मुद्दयावरून पालिका सभेत काही काळ गोंधळ ...

Municipal Councilor's Political Party's Standing Committee | नगरसेविक पूत्राच्या राडय़ाचे पालिका सभेत पडसाद

नगरसेविक पूत्राच्या राडय़ाचे पालिका सभेत पडसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मंगळवारी पालिकेत झालेल्या तोडफोड प्रकरणी नगराध्यक्षांनी निषेध नोंदविण्याच्या मुद्दयावरून पालिका सभेत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. अखेर बांधकाम सभापतींनी बाजू मांडल्यानंतर वाद शमला. सभेत एकुण नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, मंगळवारच्या घटनेच्या पाश्र्वभुमीवर सभेच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. 
पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी 11 वाजता झाली. अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष परवेजखान होते. प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवक उपस्थित होते. बैठकीच्या अजेंडय़ावर एकुण नऊ विषय होते. पैकी काही विषयांवर विरोधकांनी आक्षेप घेत विरोध केला. 
बैठकीच्या शेवटी प्रभारी नगराध्यक्ष परवेजखान यांनी मंगळवारी भाजप नगरसेविकेच्या पूत्राने पालिकेत घातलेल्या धुडगूसचा निषेध नोंदविला. त्याला भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला. संबधीत युवकाचा तोल का सुटला याचाही विचार करावा, एकतर्फी निषेध नोंदविण्याऐवजी कारभारात सुधारणा कराव्या असे विरोधी नगरसेवकांनी सांगितले. त्यावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. दोन्ही गटातील नगरसेवक डायसजवळ आल्याने परिस्थिती गोंधळाची झाली. यातच काही नगरसेवकांनी तेथून काढता पाय घेतला. बांधकाम समिती सभापती कुणाल वसावे यांनी बाजू मांडण्याचा प्रय} केला. कुठले काम अडले, कोणते बाकी आहे याबाबत आपल्याशी चर्चा केली असती तर समाधानकारक तोडगा निघाला असता. परंतु लक्ष्मण माळी यांनी थेट आपल्याच दालनाला कुलूप लावले. नगराध्यक्षांच्या केबीनची तोडफोड केली हे कुणीही सहन करणार नाही. संबधीत युवकाच्या आई अर्थात नगरसेविका यांनीही कोणती कामे थांबली, रखडली याची माहिती दिली. कामाच्या ठिकाणी येण्याचेही त्यांनी वसावे यांना सांगितले.  त्यानंतर वादावर पडदा पडला. 
विषय पत्रिकेवरील आरक्षण व्यपगत झाल्याचे आदेश पारित करण्याच्या मुद्यावरून विरोधी नगरसेवकांनी सत्ताधारींना चांगलेच धारेवर धरले. बांधकाम अभियंत्यांना याबाबत स्पष्टीकरण करायला लावण्यास भाग पाडले. पालिका हद्दीतील स.नं.135/2/3 व स.नं.73/1/ब/2, 73/6-1, 73-6-2 हे प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान याचे आरक्षण व्यपगत झाल्याचे आदेश पारीत करण्याचा मुद्दा होता. त्यावर विरोधी नगरसेवक चारूदत्त कळवणकर यांनी काही व्यक्ती असे भुखंड खरेदी- विक्री करून स्वत:चे हित पहात असल्याचे सांगितले. संबधीत जागा मालक कोण, त्यांचे नाव जाहीर करण्यासही त्यांनी भाग पाडले. 
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ओडीएफ व स्टार रेटींगसाठी पालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक शौचालयांमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या खर्चास मान्यता देण्याच्या प्रश्नावर देखील विरोधकांनी आक्षेप घेतला. याशिवाय इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीसंदर्भात उत्सूकता लक्षात घेता मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरिक्षक नंदवाळकर, उपनिरिक्षक पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी तैणात होते. 

Web Title: Municipal Councilor's Political Party's Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.