खेडदिगरला कोब्रा जातीच्या दोन सापांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:08 PM2018-11-15T13:08:21+5:302018-11-15T13:08:25+5:30

म्हसावद : खेडदिगर ता.शहादा येथून मध्यप्रदेशातील गारूडीकडून अवैधरित्या कोंबून ठेवलेले दोन कोब्रा जातीचे साप शहाद्याच्या सर्पमित्रांनी ताब्यत घेत शहादा ...

Lives of two cobra species of Kobra | खेडदिगरला कोब्रा जातीच्या दोन सापांना जीवनदान

खेडदिगरला कोब्रा जातीच्या दोन सापांना जीवनदान

googlenewsNext

म्हसावद : खेडदिगर ता.शहादा येथून मध्यप्रदेशातील गारूडीकडून अवैधरित्या कोंबून ठेवलेले दोन कोब्रा जातीचे साप शहाद्याच्या सर्पमित्रांनी ताब्यत घेत शहादा वनविभागाच्या हवाली केल़े दरम्यान दोन्ही गारूडी अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती आह़े या दोन्ही गारुडींचा शोध घेण्यासाठी शहादा वनविभागाने दोन पथके तयार केली असून मध्यप्रदेशात त्यांचा शोध घेतला जाणार आह़े 
10 दिवसापासून दोन गारूडी खेडदिगर ता.शहादा भागात सापांचा खेळ करत असल्याची माहिती सर्पमित्र  भिमसेन रावताळे यांना मिळाली होती़ त्यांनी तपास केला असता फुलसिंग आणि बबलू दोन्ही रा.पलसूद ता.राजपूर,जि.बडवाणी (मध्यप्रदेश) नामक व्यक्ती खेडदिगर परिसरात घरात साप असेल तर  काढण्यासाठी एक हजार रुपए वसूल करतात नाहीतर घरात साप सोडून देण्याची धमकी देत असल्याची माहीती मिळाली होती़ दोघांकडे 5 ते 6  कोब्रा साप असून ते खेळ असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले होत़े यानुसार सर्पमित्रांनी वनविभागाला माहिती दिली होती़ दरम्यान मंगळवारी रात्री  शहादा येथील सर्पमित्र  सागर निकुंभे,भिमसेन रावताळे, दिपक मोरे, महेश पवार,राहूल कोळी, स्वप्निल इंगळे,रूपेश कोळी, यांचेसह लोणखेडा येथील अमोल जमादार, संदीप माळी,जयेंद्र राजपूत यांनी खेडदिगर येथे दोघा गारुडींच्या मुक्कामस्थळी छापा टाकला होता़ यात दोघे पळून गेल्यानंतर तेथून 2 नाग हस्तगत करण्यात आल़े दोन्ही नाग वनविभागाकडे सोपवण्यात आल़े 
उपवनसंरक्षक एस.बी.केवटे, सहाय्यक  वनसंरक्षक एस.आर.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली असून  मध्यप्रदेशात रवाना करणार असल्याची माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल पवार यांनी दिली़ साप भारतीय वनअधिनियम कायदा 1972 शेड्यूल 2 मध्ये येत असून संरक्षीत असल्याचे सांगीतले.
 

Web Title: Lives of two cobra species of Kobra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.