साक्षरता झाली 71 टक्के तरीही राज्यात शेवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:46 AM2019-03-31T11:46:03+5:302019-03-31T11:46:35+5:30

साक्षर भारत मिशनही फेल : दहा वर्षात केवळ सहा टक्के वाढ

Literacy was 71 percent even last in the state | साक्षरता झाली 71 टक्के तरीही राज्यात शेवटच

साक्षरता झाली 71 टक्के तरीही राज्यात शेवटच

Next

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याची साक्षरता दहा वर्षात 64 वरून 71 टक्केर्पयत आली असली तरी राज्यात नंदुरबार साक्षरतेबाबत सर्वात शेवट असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. साक्षर भारत मिशन अंतर्गत झालेल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यात नंदुरबारची साक्षरता सात टक्क्यांनी वाढली आहे.  
साक्षरता, दरडोई उत्पन्न व मानव निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रय} सुरू आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मोजक्या आश्वासीत जिल्ह्यांमध्ये देखील नंदुरबारचा समावेश केलेला आहे. या अंतर्गत विविध विकास कामे व उपक्रम सुरू आहेत. आता साक्षरता 71 टक्केर्पयत आली असली तरी ती राज्यातील जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे.  साक्षरतेबाबत नंदुरबार आजही तळाला असल्याचे यावरून स्पष्ट होते.
56 वरून 71 टक्के..
नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर 2001 मध्ये झालेल्या जनगणनेत जिल्ह्याची साक्षरता 56.00 टक्के इतकी होती. जिल्हा निर्मितीनंतर शिक्षणाची साधने वाढली, सातुपडय़ाच्या दुर्गम भागार्पयत दळणवळण यंत्रणा पोहचली. परिणामी जिल्ह्यात साक्षरतेची टक्केवारी 55 वरून दहा वर्षात अर्थात 2011 च्या जनगणनेत 64.38 टक्केर्पयत पोहचली. तरीही जिल्हा साक्षरतेबाबत बराच मागे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा साक्षरता वाढीसाठी प्रय} सुरू झाले. त्यासाठी 2009 मध्ये सुरू करण्यात आलेल्या साक्षर भारत मिशनचा आधार घेण्यात आला. या मिशनअंतर्गत जास्तीत जास्त निरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रय} सुरू झाले. त्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली. एवढे करूनही 2009 ते 2019 या कालावधीत साक्षरतेची आकडेवारी केवळ सात टक्क्यांनी वाढू शकली. 
काय होते मिशन
साक्षर भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील 15 वर्षापेक्षा मोठय़ा निरक्षरांचा सव्र्हे करून त्यांना साक्षरता वर्गामध्ये आणण्यात येणार होते. या निरक्षरांना शिकविण्यासाठी अर्थात किमान तिसरी इयत्तेच्या लेव्हलचे शिक्षण समजावे यासाठी प्रेरकांची नियुक्ती करण्यात आली. 
या प्रेरकांना जिल्हा व तालुका स्तरावर प्रशिक्षीत करून त्यांना साक्षरता मिशनचे कार्य देण्यात आले. या प्रेरकांतर्फे गाव, पाडय़ांवर जावून निरक्षकांना साक्षर करण्याचे काम देण्यात आले. परंतु दहा वर्षात साक्षर भारतचे काम फारसे प्रगतीत झाले नाही हे स्पष्ट आहे. 
 

Web Title: Literacy was 71 percent even last in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.