अपघातात चार जण जखमी : खापरजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:39 PM2018-02-24T12:39:01+5:302018-02-24T12:39:01+5:30

Four people injured in accident: Khapar incident | अपघातात चार जण जखमी : खापरजवळील घटना

अपघातात चार जण जखमी : खापरजवळील घटना

Next


ऑनलाईन लोकमत
कोठार, दि़ 24 : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावरील खापरजवळील कौली ते कुंभारखान फाटय़ादरम्यान दोन मोटारसायकलींची समोरसमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत वृत्त असे की, कवळीथ, ता.शहादा येथील वसंत पंडित गोसावी (39) हे त्यांची दोन मुले लक्ष्मण वसंत गोसावी (16) व अविनाश वसंत गोसावी (12) यांच्यासह मोटारसायकलीने (क्र.जीजे-5 डीडी- 6665) देवमोगरा येथे याहामोगी मातेच्या दर्शनासाठी जात होते. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते कुंभारखान फाटय़ापासून थोडे पुढे आले असता ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणा:या मोटारसायकलला (क्र.जीजे-5 एमएन- 2792) त्यांची धडक झाली. दोन्ही मोटारसायकल समोरासमोर धडकल्याने चारही जण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातातवसंत गोसावी व त्यांच्या मुलांना हात व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दुस:या मोटारसायकलवरील नमूभाई उरमलभाई पावरा (56) यांनाही जबर मुका मार लागला आहे. अपघात घडल्यानंतर दुस:या वाहनांवरील प्रवाशांनी आपली वाहने थांबवून जखमींना व अपघातग्रस्त मोटारसायकलींना रस्त्यावरून उचलून बाजूला केले. अक्कलकुवा पोलीस स्टेशनला कळविण्यात आल्यानंतर काही वेळातच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी खुशाल माळी, गिरीष सांगळे, संदीप महाले हे घटनास्थळी दाखल झाले. खापर येथील सामाजिक कार्यकर्ते व उपलब्ध वाहन चालकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर वसंत गोसावी, लक्ष्मण गोसावी व अविनाश गोसावी यांना नंदुरबार येथे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Four people injured in accident: Khapar incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.