पाणी भरण्यासाठी उडतेय झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:13 PM2018-08-06T13:13:07+5:302018-08-06T15:00:34+5:30

पाणीटंचाई : खोडसगाव, खोंडामळी, कोळदे, शिंदे गावांची स्थिती

Flutter | पाणी भरण्यासाठी उडतेय झुंबड

पाणी भरण्यासाठी उडतेय झुंबड

googlenewsNext

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, कोळदे, शिंदे, खोडसगाव, खोंडामळीसह परिसरात भरपावसाळ्यात पाणी टंचाईची समस्या जाणवत आह़े पाणी नसल्याने येथील हातपंपावर पावसाळ्यातही रांगा कायम असल्याची विदारक स्थिती निर्माण झालेली आह़े 
या गावांमधील हातपंपावर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड होत आह़े काहींना पाणी मिळत नसल्याने अनेक वेळा शाब्दीक चकमक होत असत़े पावसाने पाठ फिरवली असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े 
शेतकरी जुन महिन्याच्या पहिल्या व शेवटच्या आठवडय़ात कापूस टोचणी, ज्वारी पेरणी, मिरची लावणी करीत असतात़ जुलै-ऑगस्ट महिन्यात पिक बहरत असल्याने त्यांना पाण्याची मोठी गरज असत़े परंतु आता पाणीटंचाईमुळे पिकांना पाणी मिळत नसल्याने साहजिकच पिक धोक्यात आलेली आहेत़ 
पाऊसच नसल्याने येथील विहिरी तसेच गाव तलावांनी तळ गाठला आह़े त्यामुळे साहजिकच 8 ते 15 दिवस पाणीपुरवठा होत नाही़ ग्रामस्थांनी साठवणूक केलेले पाणीसुध्दा संपूण जात असल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत असत़े ब:याच प्रतीक्षेनंतर आलेले पाणीसुध्दा कमी दाबाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े परिसरात बोटावर मोजण्याइतकेच हातपंप असल्याने त्यावरच संपूर्ण गावांची भिस्त आह़े पाणी पातळीत घट झाल्याने त्यातूनही अत्यंत कमी पाणी  येत आह़े 
याबाबत प्रशासनाने लक्ष देऊन पाण्याची समस्या दूर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून येथे पाणीपुरवठयाची समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे ग्रामस्थाना विशेषता महिला वर्गाला पाण्यासाठी तासन्तास हातपंपावर रांगा लावाव्या लागत आहे. पावसाळ्यातसुध्दा पाणीटंचाई निर्माण झाल्याने सर्वच चिंतेत आहेत़
 

Web Title: Flutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.