शनिमांडळ परिसरात मजूर टंचाईने शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:25 PM2017-11-05T13:25:48+5:302017-11-05T13:25:48+5:30

Farmer Metakuchese with labor scarcity in the Shani Mandal area | शनिमांडळ परिसरात मजूर टंचाईने शेतकरी मेटाकुटीस

शनिमांडळ परिसरात मजूर टंचाईने शेतकरी मेटाकुटीस

Next
ठळक मुद्देवाहनाची सोय उपलब्ध
कमत न्यूज नेटवर्कशनिमांडळ : तळोदा तालुक्यातील शनिमांडळसह लगतच्या परिसरात मजुर टंचाईमुळे शेतकरी बेहाल आहेत़ खरिप हंगाम काढणीच्या कामांना वेग आला असल्याने शेतक:यांकडून आता मजुरांची शोधाशोध होत आह़ेखरिप हंगामाच्या कामांना शेतक:यांकडून सुरुवात करण्यात आली आह़े परंतु मजुरांना रोख पैसा मोजूनदेखील मजुर टंचाई जाणवत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े दस:यापूर्वी ऊस तोडणी करणा:या मजुरांचे मोठय़ा संख्येने स्थलांतर झाल्याने व मध्येच पावसाने हजेरी लावल्याने खरिप हंगाम काढणी काहीशी लांबली होती़ मात्र आता दिवाळी उलटल्याने खरिप हंगाम काढणीसाठी शेतक:यांची लगीनघाई सुरु असल्याचे पहावयास मिळत आह़े कापूस वेचणी, कांदा काढणी, भुईमूग, बाजरी, मका, मिरची तोडणी आदी शेतीची सर्वच कामे एकाच वेळी करण्यात येत आहेत़ अध्र्या दिवसाला 200 रुपये मजुरी रोखीने देऊनही मजुर मिळत नसल्याचे वास्वव आह़े अन्य कामापेक्षा शेंगा काढणीच्या कामाला मजुरांची पसंती असत़े कारण दोनशे रुपयांबरोबरच मेहनत घेतली म्हणून शेंगाही दिल्या जातात़ मात्र तरीही मजुर मिळत नसल्याने शेतक:यांची मोठय़ा प्रमाणात फिराफिर होत असल्याच्या व्यथा त्यांच्याकडून मांडण्यात येत आहेत़ हीच परिस्थिती कापूस, कांदा, मका, बाजरी आदी कामांबाबत दिसून येत आह़े

Web Title: Farmer Metakuchese with labor scarcity in the Shani Mandal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.