नंदुरबारात अत्यल्प साठय़ामुळे पाणीकपात लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:23 PM2018-08-09T13:23:37+5:302018-08-09T13:23:43+5:30

Due to low stock in Nandurbar, the water crisis will be organized by the people | नंदुरबारात अत्यल्प साठय़ामुळे पाणीकपात लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबारात अत्यल्प साठय़ामुळे पाणीकपात लोकमत न्यूज नेटवर्क

Next

नंदुरबार : विरचक प्रकल्पातील अवघा 12 टक्के पाणीसाठा लक्षात घेता नंदुरबारकरांना आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. साधारणत: 20 ते 25 मिनिटे पाणी कपात शक्य आहे. त्यादृष्टीने पालिकेने नियोजन सुरू केले आहे. सुदैवाने येत्या काही दिवसात दमदार पाऊस झालाच तर पाणी कपातीचे संकट टळू शकणार आहे.
नंदुरबार शहराला विरचक प्रकल्पातील पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी प्रकल्पाच्या ठिकाणी पंपींग स्टेशन आणि जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची क्षमता लक्षात घेता 50 टक्के प्रकल्प भरला तरी वर्षभर पाणी टंचाईची समस्या दूर होते. गेल्या वर्षी प्रकल्प 41 टक्के भरला होता. त्यामुळे वर्षभर पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही. परंतु पावसाळ्याचे दोन महिने झाले तरी अद्याप दमदार पाऊस न झाल्याने आणि त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा होऊ न शकल्याने आता नंदुरबारकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे. 
मृत व जिवंत साठा
प्रकल्पात सद्य स्थितीत 12 टक्के जिवंत तर 18 टक्के मृत साठा आहे. पालिकेसाठी धरणातील 4.60 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा राखीव असतो. सध्याचा 7.65 दशलक्ष घनमिटर साठय़ातील तेवढा साठा पालिकेचा हिस्स्याचा आहे. परंतु त्यात मृत साठय़ाचा देखील समावेश आहे. जर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील पुरेसा पाऊस झालाच नाही तर पुढील काळात नंदुरबारकरांसमोर मोठी समस्या वाढून ठेवली आहे. ही बाब लक्षात घेता आतापासूनच आहे तो पाणीसाठा काटकसरीने वापरल्यास पुढील काळातील टंचाई काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. त्यादृष्टीने आता पालिकेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सद्याचा पाणीपुरवठा
सध्या एक दिवसाआड 45 ते 60 मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. जो शहरवासीयांच्या दृष्टीने पुरेसा आहे. प्रत्येक झोननिहाय हा पाणीपुरवठा केला जातो. कधी तांत्रिक समस्या उद्भवलीच तर त्यात खंड पडतो. अन्यथा नियमितपणे अशाच पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेचे असते. याशिवाय पालिका शासकीय कार्यालये, शासकीय वसाहती यांना मिटरप्रमाणे पाणीपुरवठा करीत असते.
20 ते 25 मिनिटे कपात
सद्याचा पाणीसाठा लक्षात घेता येत्या चार ते पाच दिवसापासून किमान 20 ते 25 मिनिटे पाणी कपात शक्य आहे. पाणपुरवठा विभाग आणि पाटबंधारे विभाग यांनी आणखी वेगळाच अहवाल दिला तर दोन दिवसाआड 45 ते 50 मिनिटे पाणीपुरवठा करणे असाही एक पर्याय राहणार आहे. परंतु दोन दिवसाआड पाणीपुरवठय़ाला शहरवासयांचा विरोध असू शकतो. त्यामुळे आहे त्या वेळेतच 20 ते 25 मिनिटांची कपात या पर्यायावर नगराध्यक्षा र}ा रघुवंशी निर्णय घेऊ शकतात.
चारी किंवा उतारचा पर्याय
विरचक प्रकल्पाचे मुख्य गेट ते पालिकेला पाणी पुरवठा करणारे पंपींग स्टेशन अर्थात इंटकवेल यात अंतर जास्त आहे. सध्याचा पाणीसाठा हा इंटकवेलपासून लांब अंतरावर आहे. त्यामुळे साठलेले पाणी इंटकवेलर्पयत आणण्यासाठी  धरणात त्या भागात उतार करणे किंवा चारी करून ते पाणी आणणे हा पर्याय आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सुचना नगराध्यक्षांनी दिल्या आहेत.
पाणी जपून वापरावे
सध्याची पावसाची स्थिती आणि एकुणच पाणीसाठा लक्षात घेता शहरवासीयांनी पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. पावसाळ्याचे अवघे दिड महिने शिल्लक आहेत. या दिड महिन्यातील पावसाची स्थिती कशी असते त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. जर अपेक्षीत पाऊस झालाच नाही आणि प्रकल्पातही नव्याने पाणीसाठा झाला नाही तर आणखी पाणी कपातीचे संकट राहणार आहे. 
ही बाब लक्षात घेता आतापासूनच नागरिकांन पाणी जपून वापरावे अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने पालिकेतर्फे जनजागृती करण्यात येणार आहे.
 

Web Title: Due to low stock in Nandurbar, the water crisis will be organized by the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.