नंदुरबार तालुक्यातील ग्रा.पं.पोट निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्ह वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:30 PM2018-02-19T17:30:03+5:302018-02-19T17:30:13+5:30

Distribution of symbols to candidates for Gram Panchayat elections in Nandurbar taluka | नंदुरबार तालुक्यातील ग्रा.पं.पोट निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्ह वाटप

नंदुरबार तालुक्यातील ग्रा.पं.पोट निवडणुकीसाठी उमेदवारांना चिन्ह वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील सैंताणे, रनाळे खुर्द आणि राकसवाडे येथील प्रभागनिहाय पोट निवडणुकीतील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले असून, 27 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 28 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
सैताणे येथील प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी असून, यात अनिता डिगंबर पाटील (कपबशी), दर्शना नेमीचंद पाटील (रोड रोलर). 
रनाळे खुर्द येथील प्रभाग दोनमध्ये प्रभा धिमू गावीत (टोपली), रमुली बिज्या गावीत (कपबशी), अनुसूचित जमाती स्त्री राखीव राकसवाडे प्रभाग दोनसाठी तीन अर्ज दाखल झाले. त्यात ललिता भरत भिल (कपबशी), अनिता गणेश वळवी (शिवण मशीन), सरला विष्णू भिल (छताचा पंखा)               या प्रमाणे चिन्ह वाटप करण्यात आले. दरम्यान 27 रोजी मतदान होणार असून, 28 ला मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार जी.एस. पाटील यांनी दिली.
 

Web Title: Distribution of symbols to candidates for Gram Panchayat elections in Nandurbar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.