नंदुरबारात वेगवेगळ्या घटनेत बलात्कारासह विनयभंगाचे दोघांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:03 PM2018-09-25T12:03:28+5:302018-09-25T12:03:34+5:30

Crime in both cases of rape and molestation in different incidents in Nandurbar | नंदुरबारात वेगवेगळ्या घटनेत बलात्कारासह विनयभंगाचे दोघांवर गुन्हे

नंदुरबारात वेगवेगळ्या घटनेत बलात्कारासह विनयभंगाचे दोघांवर गुन्हे

Next

नंदुरबार : राडीकलम, ता.धडगाव येथे महिलेवर बलात्काराची तर घंटाणी येथे महिलेचा विनयभंगाची घटना घडली. याबाबत धडगाव व अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राडीकलमचा बारीपाडा येथील 30 वर्षीय महिला 21 रोजी घरात एकटी असतांना गावातीलच प्रताप ओंकार पावरा (28) याने घरात प्रवेश करून महिलेशी अपकृत्य केले. महिलेच्या तोडात बोळा कोंबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कुणाला सांगितल्यास ठार    मारण्याची धमकी दिली. सकाळी उठल्यावर महिलेने नातेवाईकांना ही बाब सांगितली. त्यानंतर महिलेने धडगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. 
महिलेच्या फिर्यादीवरून प्रताप ओंकार पावरा याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतास लागलीच अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस निरिक्षक एस.बी.भामरे करीत आहे. 
दुसरी घटना घंटाणी, ता.अक्कलकुवा येथे घडली. गावातील 34 वर्षीय महिला आनंदा दामू वळवी यांच्या शेताजवळून जात असतांना वळवी याने महिलेला  अडवून तिला ओढत शेतात नेले.     तेथे तिच्याशी अलि वर्तन        केले. 
महिलेने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून घेत तेथून पळ काढला. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा   पोलिसात आनंदा वळवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार राम वळवी करीत आहे.    
 

Web Title: Crime in both cases of rape and molestation in different incidents in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.