संपत्तीच्या वादातून भाऊ, वहिणीसह आईविरुद्धही गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 04:42 PM2018-11-06T16:42:55+5:302018-11-06T16:43:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संपत्तीच्या वादातून वडिलांना आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप करीत मुलाने भाऊ, वहिनी व आई यांच्याविरुद्ध ...

The crime against the mother, brother and sister through property dispute | संपत्तीच्या वादातून भाऊ, वहिणीसह आईविरुद्धही गुन्हा

संपत्तीच्या वादातून भाऊ, वहिणीसह आईविरुद्धही गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संपत्तीच्या वादातून वडिलांना आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप करीत मुलाने भाऊ, वहिनी व आई यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेलंबा, ता.अक्कलकुवा येथे ही घटना  घडली.
बाळकृष्ण नारायण मराठे (82) रा.खापर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. बाळकृष्ण मराठे यांचा मुलगा ईश्वर व चंद्रकांत उर्फ अभिषेक या दोघांमध्ये संपत्तीवरून वाद होता. चंद्रकांत व त्यांच्या प}ीने बाळकृष्ण यांचे जबरीने स्टॅम्प पेपरवर सही करायला लावली. त्यासाठी आई शेवंताबाई बाळकृष्ण मराठे यांनीही त्यांना मदत केली. यासाठी बाळकृष्ण यांना त्रासही दिला जात होता. त्या त्रासातूनच त्यांनी कोराई शिवारातील बहिरम अंकलेश्वरीया यांच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. तसे त्यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत देखील लिहून ठेवले असल्याचा दावा ईश्वर मराठे यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे. 
त्यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिसात चंद्रकांत उर्फ अभिषेक, उर्मीलाबाई चंद्रकांत रा.विद्यानगर, आनंद (गुजरात) व शेवंताबाई बाळकृष्ण मराठे रा.सेलंबा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार वाय.एस.राऊत करीत आहे. 
 

Web Title: The crime against the mother, brother and sister through property dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.