जिल्हाधिका:यांची विविध विभागांना भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:09 AM2019-07-19T11:09:57+5:302019-07-19T11:10:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी गुरुवारी सकाळी पदभार घेतला. सरदार सरोवर प्रकल्पाचे अप्पर जिल्हाधिकारी ...

Collector: Visit to various departments | जिल्हाधिका:यांची विविध विभागांना भेट

जिल्हाधिका:यांची विविध विभागांना भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी गुरुवारी सकाळी पदभार घेतला. सरदार सरोवर प्रकल्पाचे अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पदभारानंतर त्यांनी प्रशासकीय कार्यालयातील विविध विभागांना भेटी दिल्या. 
यावेळी गा:हाणे निराकरण प्राधिकरणाचे अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार उपस्थित होते. डॉ.भारूड हे मुळचे साक्री तालुक्यातील सामोडे येथील रहिवासी आहेत. उपक्रमशील अधिकारी म्हणून परिचीत आहेत. त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाज पाहताना आपल्या अभिनव उपक्रमाद्वारे जिल्हा परिषदेचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले. त्यांचा तत्कालिन पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. 25 हजारावर घरकुले बांधून सोलापूर जिल्हा परिषदेला राज्यात अग्रस्थानी आणले. शोषखड्डे गिफ्ट गाव आणि गटारमुक्त गाव ही संकल्पना त्यांनी राबविली. 200 ग्रामपंचायती गटारमुक्त केल्या. आषाढी सोहळ्यात ‘पंढरीच्या दारी स्वच्छतेची वारी’ या उपक्रमाद्वारे त्यांनी वारी मार्गावर स्वच्छता जनजागृती केली. 
जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयांना भेटी देवून पाहणी केली.  विविध विभागांच्या अधिका:यांनी  भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.
 

Web Title: Collector: Visit to various departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.