नंदुरबारात भाजपाची मोदी लाट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:49 PM2019-05-24T12:49:29+5:302019-05-24T12:49:35+5:30

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ.हीना गावीत व काँग्रेसचे आमदार अॅड.के.सी. पाडवी या दोघांमध्ये मोठी चुरस होती. मतदानाची ...

BJP's Modi wave in Nandurbar continued | नंदुरबारात भाजपाची मोदी लाट कायम

नंदुरबारात भाजपाची मोदी लाट कायम

Next

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ.हीना गावीत व काँग्रेसचे आमदार अॅड.के.सी. पाडवी या दोघांमध्ये मोठी चुरस होती. मतदानाची टक्केवारीही या वेळी वाढली होती. या मतदारसंघात एकूण 18 लाख 70 हजार मतदार होते. त्यापैकी 12 लाख 77 हजार मतदारांनी मतदान केले होते. गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून येथील वखार महामंडळाच्या गोदामात चोख सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात झाली. 
सुरुवातीच्या तीन फे:यात काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र भाजपने मुसंडी घेत शेवटर्पयत लीड कायम राखला. मतमोजणीअखेर भाजपच्या उमेदवार डॉ.हीना गावीत यांना 6,39,136 एवढे मते तर काँग्रेसचे उमेदवार अॅड.के.सी. पाडवी यांना 5,43,507 एवढी मते मिळाली. 95,629 मतांनी डॉ.हीना गावीत यांचा विजय जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना मिळालेली मते अशी : वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार सुशिल अंतुर्लीकर यांना 25,702 मते मिळाली. रेखा देसाई यांना 11,466, क्रिष्णा ठेगा गावीत यांना 4,438, संदीप वळवी यांना 2,196, अजय गावीत यांना 4,497, अजरूनसिंग वसावे यांना 2,936, अशोक पाडवी यांना 4,930, आनंदा कोळी 7,185, डॉ.सुहास नटावदकर यांना 13,820 मते मिळाली.
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. टपाली मतमोजणीसाठी आठ तर ईटीबीपीएससाठी दोन टेबल लावण्यात आले होते. अवघ्या अर्धा तासात ही मतमोजणी झाल्यानंतर लागलीच मतदान यंत्रातील मतमोजणीला सुरुवात झाली. पहिली फेरी अर्धा तासात झाली. परंतु अधिकृत घोषणा एक तासांनी जाहीर करण्यात आली. 
नंदुरबार व साक्री विधानसभेच्या 27 तर शहादा, नवापूर, अक्कलकुवा 25 व शिरपूर विधानसभा मतदारसंघाच्या 24 फे:यांमध्ये मतमोजणी पुर्ण करण्यात आली. 18 व्या फेरीनंतर कल दिसून आल्याने भाजपने विजयाचा जल्लोष सुरू केला होता.  

Web Title: BJP's Modi wave in Nandurbar continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.