नर्मदा बॅक वॉटरमध्ये डुंगी उलटून बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:42 AM2018-11-20T11:42:56+5:302018-11-20T11:43:07+5:30

तळोदा : नर्मदा नदीच्या बॅक वॉटरमधून डुंगीने (लाकडी ओंडका) जात असतांना दोन मुली बुडाल्या. पैकी एकीला वाचविण्यात यश आले ...

Balika died in the Narmada Backwater | नर्मदा बॅक वॉटरमध्ये डुंगी उलटून बालिकेचा मृत्यू

नर्मदा बॅक वॉटरमध्ये डुंगी उलटून बालिकेचा मृत्यू

Next

तळोदा : नर्मदा नदीच्या बॅक वॉटरमधून डुंगीने (लाकडी ओंडका) जात असतांना दोन मुली बुडाल्या. पैकी एकीला वाचविण्यात यश आले आहे. साव:या दिगर, ता.धडगाव येथे 19 रोजी सकाळी ही घटना घडली. पलिकडच्या गावात किराणा दुकानात डुंगीने या बालिका जात होत्या. दरम्यान, या गावाला जाण्यासाठी कोटय़ावधी खर्चाचा रस्ता व पूल मंजुर असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
सपना वाद:या पावरा (12) रा.साव:या दिगर असे मयत मुलीचे नाव आहे. ती जीवन शाळेत इयत्ता सातवीत शिकत होती. तर मोगी वकल्या पावरा (सात वर्ष) असे वाचविण्यात आलेल्या बालिकेचे नाव आहे.
सरदार सरोवर प्रकल्पातील साव:या दिगर गाव हे बुडीतात येते. त्याला बेटाचे स्वरूप आले आहे. पलिकडच्या गावात जाण्यासाठी गावक:यांना लाकडाच्या ओंडक्यापासून तयार केलेल्या डुंगीने पाण्यातून जावे लागते. सपना पावरा व  मोगी पावरा या दोन मुली सोमवारी सकाळी पलिकडच्या गावात किराणा दुकानात जाण्यासाठी डुंगीने निघाल्या होत्या. खोल पाण्यात आल्या असत्या अचानक त्यांच्या डुंगीने हेलकावे घेतल्याने दोघे त्यात बुडाल्या. सपना ही खोल पाण्यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाला तर मोगीला वाचविण्यात गावक:यांना यश आले.
नर्मदा आंदोलनाचा आरोप
टापू क्षेत्रासाठी नेमलेल्या भिंगारे समितीने 2004-05 मध्ये साव:या दिगर या गावासाठी रस्ता बनवून दिल्यास पुनर्वसनाची गरज नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे कोटय़ावधी खर्चाचा रस्ता व पूल मंजुर करण्यात आला आहे.  नर्मदा आंदोलनाने वेळोवेळी मागणी करूनही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. गेल्या वर्षी भूषा येथे नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे डॉ. अफरोज अहमद आले असता नर्मदा आंदोलनाने त्यांचेकडे तक्रार केली होती. त्यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराला मार्च 2018 पयर्ंत काम पूर्ण करण्यासंदर्भात आदेश देवून कारवाईचाही इशारा दिला होता. परंतू रस्त्याचे काम आजही बंदच आहे. रस्ता पूर्ण होईपयर्ंत  दळणवळणासाठी मोफत बोट उपलब्ध करून देण्याच्या सुचनेकडीही दुर्लक्ष झाले आहे. ही बोटही नियमित स्वरूपात राहत नाही. या सर्व समस्येमुळेच आज नाहक एका निरागस बालिकेला जीव गमवावा लागल्याचा आरोपही नर्मदा आंदोलनाने केला आहे.
 

Web Title: Balika died in the Narmada Backwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.