सारंगखेडय़ाचे 9 तर प्रकाशा बॅरेजचे 8 दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:20 PM2018-08-22T13:20:32+5:302018-08-22T13:20:39+5:30

8 doors of Sarangkhedaya and 8 doors of lighting Barrej opened | सारंगखेडय़ाचे 9 तर प्रकाशा बॅरेजचे 8 दरवाजे उघडले

सारंगखेडय़ाचे 9 तर प्रकाशा बॅरेजचे 8 दरवाजे उघडले

Next

नंदुरबार/सारंगखेडा : तापी नदीवरील सारंगखेडा बॅरेजचे नऊ तर प्रकाशा बॅरेजचे आठ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आह़े यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े 
मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 32 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले होत़े यामुळे तापी पात्रात 79 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता़ यातून दुपारी 1 वाजता सारंगखेडा बॅरेजचे 9 दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत़ यातून 76 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता़ यामुळे तापी पात्राची पातळी वाढल्याने दुपारी दोन वाजता प्रकाशा बॅरेजचे आठ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आल़े येथून 63 हजार 862 क्यूसेस पाण्याचा विसर्ग झाला आह़े 
सारंगखेडा येथे बॅरेजचे उप अभियंता क़ेएस़बांगर व वरिष्ठ लिपिक सी़आऱयादव हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत़ दरम्यान तापी पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांना मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश काढता आढावा घेतला होता़ शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील तापी नदी काठावरील गावांमध्ये दवंडी देण्यासह ग्रामपंचायत  प्रशासनाला कळवून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े 
 

Web Title: 8 doors of Sarangkhedaya and 8 doors of lighting Barrej opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.