नंदुरबार जिल्ह्यात 18 मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:55 PM2017-12-14T12:55:43+5:302017-12-14T12:55:47+5:30

18 mothers in Nandurbar district die during childbirth | नंदुरबार जिल्ह्यात 18 मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात 18 मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू

Next
ठळक मुद्देरक्तस्त्रावाने झाला मृत्यू एप्रिल महिन्यात मनिषा संतोष ठाकरे रा़निझर ही 24 वर्षीय माता माता रस्त्यात प्रसूत झाली होती़ यावेळी रक्तदाब कमी झाल्याने तिचा मृत्यू झाला़ तिचे बाळ सुस्थितीत असल्याची माहिती आह़े याच महिन्यात वरीबाई विजय वळवी (27) रा़आमली ता़ अक

भूषण रामराजे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याच्या दुर्गम भागासह ठिकठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध होऊनही दरवर्षी गर्भवती मातांचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही़ एप्रिल ते डिसेंबर 2017 या आठ महिन्यात जिल्ह्यात तब्बल 18 मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आह़े 
महिला आणि बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, आशा स्वयंसेविका आणि स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुश्रुषा करण्यात येत़े यातून किमान पाच ते सहा महिने गर्भवती मातेचा आहार आणि तपासण्या करण्यात येतात़ असे असतानाही मात्र गेल्या काही वर्षात प्रसूतीदरम्यान मातांचा मृत्यू होण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत़ रक्तस्त्राव होऊन व रक्तदाब कमी होऊन  मातांचे मृत्यू झाले आहेत़ शासनाने गर्भवती मातांसाठी राबवण्यात येणा:या योजनांची दक्षतेने अमंलबजावणी करण्याची अपेक्षा आह़े 
 

Web Title: 18 mothers in Nandurbar district die during childbirth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.