नांदेड जिल्ह्यात चार हजार शिक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:57 PM2018-05-28T23:57:06+5:302018-05-28T23:57:06+5:30

शासनाच्या वतीने पहिल्यांदाच राबविलेल्या आॅनलाईन बदली पद्धतीने जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या आहेत़ यापैकी १५२ मुख्याध्यापक असून उर्दू शिक्षकांची संख्या ९९ आहे़ दरम्यान, आॅनलाईन पद्धतीने झालेल्या बदली प्रक्रियेचे बहुतांश शिक्षकांनी स्वागत केले आहे़

Transfers of 4 thousand teachers in Nanded district | नांदेड जिल्ह्यात चार हजार शिक्षकांच्या बदल्या

नांदेड जिल्ह्यात चार हजार शिक्षकांच्या बदल्या

googlenewsNext
ठळक मुद्देआॅनलाईन प्रक्रिया : १०९५ शिक्षक झाले विस्थापित, पुन्हा अर्ज करावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शासनाच्या वतीने पहिल्यांदाच राबविलेल्या आॅनलाईन बदली पद्धतीने जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या आहेत़ यापैकी १५२ मुख्याध्यापक असून उर्दू शिक्षकांची संख्या ९९ आहे़ दरम्यान, आॅनलाईन पद्धतीने झालेल्या बदली प्रक्रियेचे बहुतांश शिक्षकांनी स्वागत केले आहे़
शासनाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी काढलेल्या आदेशानुसार शाळांच्या पसंती क्रमांकानुसार संबंधित शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षकांच्या बदल्या पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी एनआयसी पुणे यांच्या माध्यमातून प्रक्रिया करण्यात आली़
दरम्यान, सरलच्या माध्यमातून जिल्हाअंतर्गत बदल्यांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीनवर उपलब्ध झाले़ पंचायत समिती स्तरावर शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रीय मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून बदली आदेशाचे वाटप केले असून बदली झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेल्या शाळांवर रुजू होण्यासाठी सध्याच्या शाळेतून कार्यमुक्त करण्याच्या सूचना केंद्रीय मुख्याध्यापकांना दिल्याचे नांदेडचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले.
विनंती बदलीसाठी आॅनलाईन पद्धतीने माहिती भरलेल्या शिक्षकांची कागदपत्रे चुकीची आढळल्यास त्यांची बदली रद्द करुन त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल़ तसेच बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीने नियुक्ती दिलेल्या शाळेवर हजर न झालेल्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे़ संबंधित शिक्षक शाळेवर रुजू झाल्यानंतर दुसºयाच दिवशी त्या शाळेतील मुख्याध्यापकांने याबाबतचा अहवाल तातडीने गटशिक्षणाधिकाºयांमार्फत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सादर करावयाचा आहे.
जिल्ह्यात एकूण ४ हजार ५८ शिक्षक, मुख्याध्यापक आणि पदविधर शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत़ यामध्ये अर्धापूर तालुक्यातील ६ मुख्याध्यापक, १५ पदवीधर, १४१ सहशिक्षक, भोकर - ७ मुख्याध्यापक, २२ पदवीधर, १९२ शिक्षक, बिलोली - ९ मुख्याध्यापक, १६ पदवीधर, १७२ शिक्षक, देगलूर - ९ मुख्याध्यापक, १० पदवीधर, २४७ शिक्षक, धर्माबाद - ६ मुख्याध्यापक, ८ पदवीधर, १४६ शिक्षक, हदगाव - ३० मुख्याध्यापक, ३५ पदवीधर, २७७ शिक्षक, हिमायतनगर - ६ मुख्याध्यापक, ०७ पदवीधर, १२३ शिक्षक, कंधार - ९ मुख्याध्यापक, १६ पदवीधर, ३२९ शिक्षक, किनवट - १२ मुख्याध्यापक, ४९ पदवीधर, ३३७ शिक्षक, लोहा - १३ मुख्याध्यापक, २३ पदवीधर, ३३३ शिक्षक, माहूर - ४ मुख्याध्यापक, १० पदवीधर, ११६ शिक्षक, मुदखेड - ५ मुख्याध्यापक, २५ पदवीधर, १४७ शिक्षक, मुखेड - १७ मुख्याध्यापक, २८ पदवीधर, ३९२ शिक्षक, नायगाव - ११ मुख्याध्यापक, २० पदवीधर, २१७ शिक्षक, नांदेड - २ मुख्याध्यापक, १४ पदवीधर, १६२ शिक्षक, नांदेड मनपा शाळा - १ मुख्याध्यापक, ५ पदवीधर, ३३ शिक्षक तर उमरी तालुक्यातील ०४ मुख्याध्यापक, २४ पदवीधर, ११७ शिक्षकांच्या आॅनलाईन पद्धतीने बदल्या झाल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत़ दरम्यान, शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेला अनेक शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला होता़ परंतु, बदली प्रक्रियेस समर्थन करणा-या शिक्षकांनी बदली हवी टीमच्या माध्यमातून वारंवार निवेदन देवून बदली प्रक्रियेला समर्थन दर्शविले होते़
---
जिल्ह्यात १ हजार ९५ शिक्षक झाले विस्थापित
जिल्हास्तरवरील बदली प्रक्रियेला ‘खो’ देत थेट राज्यस्तरावरून शिक्षकांच्या बदल्या झाल्या़ यामध्ये प्रत्येक शिक्षकाला बदल्यांसाठी २० गावांची निवड करण्याचा पर्याय दिला होता़ यातून एकही गाव न मिळालेले जिल्ह्यातील १०९५ शिक्षक विस्थापित झाले आहेत़ यामध्ये अर्धापूर तालुक्यातील ९१, भोकर - ३०, बिलोली- ३१, देगलूर- १०५, धर्माबाद - १५, हदगाव - ३४, हिमायतनगर - २, कंधार - ८९, किनवट - १६, लोहा - १७८, माहूर - ८, मुदखेड - ९२, मुखेड - १४१, नायगाव - ६३, नांदेड - १५२, नांदेड महापालिका - ३२ तर उमरी तालुक्यातील १६ शिक्षकांचा समावेश आहे़
ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या ते शिक्षक शाळेवर रुजू झाल्यानंतर तो अहवाल प्रशासनाला प्राप्त होईल़ यानंतर राहिलेल्या रिक्त जागांवर या विस्थापित शिक्षकांना नियुक्ती दिली जाणार आहे. यासाठी ४ ते ५ दिवसांचा कालावधीही लागू शकतो. त्यामुळे हे शिक्षक सध्यातरी अधांतरी आहेत़ पर्याय दिलेल्या २० पैकी एकही गाव न मिळाल्याने सदर शिक्षकांचा हिरमोड झाला़ शिक्षक म्हणून झालेल्या रूजु झाल्यापासूनच्या ज्येष्ठतेनुसार खो- पद्धतीने गावे निवडण्याचा अधिकार शिक्षकांना दिल्याने ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना गावे मिळाली आहेत़
---
उर्दू माध्यमाचे ९९ शिक्षक
उर्दू माध्यमाच्या शाळांमधील ९९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत़ यामध्ये अर्धापूर तालुक्यातील एका मुख्याध्यापकांचा समावेश आहे़ तर अर्धापूर तालुक्यातील पदवीधर -१ आणि ३८ शिक्षक, भोकर - पदवीधर-२, शिक्षक-५, बिलोली- पदवीधर- १, शिक्षक-१, धर्माबाद- पदवीधर १, शिक्षक ३, हदगाव - पदवीधर- १, शिक्षक-३, हिमायतनगर - पदवीधर-१, शिक्षक-७, कंधार- १ पदवीधर- ५ शिक्षक, किनवट - १ शिक्षक, माहूर - ४ शिक्षक, मुदखेड - ३ शिक्षक, नांदेड - १ पदवीधर- ९ शिक्षक, नांदेड महापालिका शाळांतील १ पदवीधर शिक्षक आणि ९ शिक्षकांचा समावेश आहे़
---
४५ टक्के वेतनाची आधीच कपात
आॅनलाईन बदली प्रक्रियेमुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा पैशाचा बाजार आणि राजकीय हस्तक्षेप थांबला़ बदली झालेल्या जवळपास सर्वच शिक्षकांनी समाधान व्यक्त केले असून दुर्गम भागातील शिक्षक या प्रक्रियेवर अधिक खूश आहेत़ अशा प्रकारची बदली प्रकिया राबविल्याबद्दल महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने आभार आणि अभिनंदऩ - जी़ एस़ मंगनाळे, जिल्हाध्यक्ष म़पु़प्रा़शिक्षक संघटना, नांदेड़
---
बदली हवी टीमकडून स्वागत
रविवारी झालेल्या बदल्यांमध्ये सर्वसामान्य शिक्षकांचा विजय झाल्याची प्रतिक्रिया रवी ढगे मुदखेडकर यांनी व्यक्त केली़ राज्याचे मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री आणि सचिवांचे आभार मानले़ या निवेदनावर रवी ढगे यांच्यासह पंडित कदम, अशोक सोळंके, विजयकुमार वारले, दत्ता ढवळे, विजयकुमार कुंडलीकर, शंकर पडगीलवार, जनार्धन कदम, प्रकाश मुंगल, गोवंदे, पत्तेवार आदींच्या स्वाक्षºया आहेत़

Web Title: Transfers of 4 thousand teachers in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.