नांदेड शहरात रामनवमीनिमित्त तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:23 AM2019-04-13T00:23:00+5:302019-04-13T00:24:00+5:30

रामनवमीनिमित्त शहरातील गाडीपुरा भागातून शनिवारी दुपारी १२ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यासाठी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे़ या शोभायात्रेत महापुरुषांसह सैनिकांना समर्पित देखाव्यांचा समावेश राहणार आहे़ जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत़

A strong police security for Ramnavami in Nanded city | नांदेड शहरात रामनवमीनिमित्त तगडा बंदोबस्त

नांदेड शहरात रामनवमीनिमित्त तगडा बंदोबस्त

googlenewsNext
ठळक मुद्देअडीच हजार पोलीस कर्मचारी तैनात

नांदेड : रामनवमीनिमित्त शहरातील गाडीपुरा भागातून शनिवारी दुपारी १२ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यासाठी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे़ या शोभायात्रेत महापुरुषांसह सैनिकांना समर्पित देखाव्यांचा समावेश राहणार आहे़ जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत़
श्री रामनवमीनिमित्त दरवर्षी गाडीपुरा भागातून भव्य शोभायात्रा काढण्यात येते़ त्यामुळे एक दिवसाकरिता वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे़ हबीब टॉकीज, जुना मोंढा, देना बँक, महावीर चौक, तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक, शिवाजीनगर, आयटीआय, श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नर जाण्या-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील़ वर्कशॉप, श्रीनगर, आयटीआय, शिवाजीनगर, वजिराबाद चौकाकडे येणारा-जाणारा रस्ता बंद राहील़ सिडको, हडको, लोहा-सोनखेड ते जुना मोंढाकडे येणारा रस्ता जुना मोंढापासून बंद राहिल़ अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट, चिखलवाडी ते महावीर चौकाकडे येणार रस्ता फॉरेस्ट आॅफीसपासून बंद राहील़ बाफना टी पॉर्इंट, कविता रेस्टॉरंट, भगतसिंघ चौक, मार्गे जुना मोंढाकडे येणारा रस्ता जुन्या मोंढापासून बंद राहील़ त्यामुळे पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ बर्की चौकाकडून जुना मोंढ्याकडे येणारी वाहतूक महम्मद अली रोड हबीब टॉकीजपासून गणेश टॉकीज मार्ग रोडचा जाण्या-येण्यासाठी वापर करतील़ वजिराबाद चौकाकडून श्रीनगर वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक तिरंगा चौक पोलीस मुख्यालय मार्ग खडकपुरा, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर, पिवळी गिरणी, गणेशनगर वाय पॉर्इंटकडे जाण्या-येण्यासाठी वापरतील़ राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक राज कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागार्जुना टी पॉर्इंट, अण्णा भाऊ साठे चौक, महाराणा प्रताप चौक या मार्गाचा वापर करतील़ गोवर्धनघाट पुलावरुन शहरात येणारी वाहतूक पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी, खडकपुरा, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर, पिवळी गिरणी, गणेशनगर वाय पॉर्इंटकडे जाणारा रस्ता वापरतील़ सिडको, हडको, लोहा-सोनखेडकडून येणारी वाहतूक साईकमान, गोवर्धनघाट, नवीन पूल, तिरंगा चौक, मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर, पिवळी गिरणी, गणेशनगर वाय पॉर्इंटकडे जाण्या-येण्यासाठी वापरतील़

Web Title: A strong police security for Ramnavami in Nanded city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.