जाधवांच्या माघारीने पायावर धोंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:40 AM2019-03-31T00:40:34+5:302019-03-31T00:42:25+5:30

लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची राळ उठण्यास सुरुवात होत आहे. कालपर्यंत नफा-तोट्याची गणिते मांडणाऱ्यांनी भावनिकतेच्या लाटेवरच अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे.

The stone at the feet of Jadhav's return | जाधवांच्या माघारीने पायावर धोंडा

जाधवांच्या माघारीने पायावर धोंडा

Next
ठळक मुद्देराजकीय वर्तुळात चर्चेला तोंड अनुभवशून्यतेमुळे सेनेत घेतले जाताहेत उफराटे निर्णय

हिंगोली : लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची राळ उठण्यास सुरुवात होत आहे. कालपर्यंत नफा-तोट्याची गणिते मांडणाऱ्यांनी भावनिकतेच्या लाटेवरच अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. मात्र त्याचा सेनेलाच जास्त फटका बसणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
यावेळी काँग्रेसचे उमेदवार असलेले सुभाष वानखेडे हे मागच्या वेळी सेनेकडून या मतदारसंघात लोकसभा लढले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील मंडळींनीच बंड पुकारले होते. वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघात दगाफटका झाला होता. वानखेडे यांचे आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा व माजी आ. गजानन घुगे यांच्याशी बिनसलेले असल्याने हा प्रकार घडला होता. लोकसभा संपली. वानखेडे पडले. मात्र या दोन्ही मतदारसंघातील वानखेडे समर्थक कमालीचे नाराज होते. विधानसभेला ते सेनेचे काम करायचे नाही, या तयारीत होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत घुगे व मुंदडा यांना तिकीट जाहीर झाले अन् वानखेडे यांनी भाजपला जवळ केले. वानखेडे समर्थकांनीही मग वसमतमध्ये भाजपच्या तंबूत जागा मिळविली. त्यात थोडेबहुत राष्ट्रवादीवर नाराज असलेलेही घुसले. परिणामी, जाधव यांनी ५0 हजारांपर्यंत मते मिळविली होती. भाजप स्वतंत्र लढण्याची चिन्हे असल्याने या मंडळीनेच जाधव यांना लोकसभेसाठी तयार केले. कुठेच उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणूनही तयारी केली. सेनेमुळे तेथेही माघार घ्यावी लागली. आता ही मंडळी सेनेसोबत जायचे कसे? असा विचार करीत आहे. तर वानखेडेही काँग्रेसकडून रिंगणात आहेत. त्यामुळे ते वानखेडे यांच्याच पदरात माप टाकतील, ही मोठी शक्यता आहे. नांदेडच्या हेमंत पाटील यांच्याशी जुळण्यापेक्षा त्यांना पूर्वीचे नेतृत्व असलेल्या वानखेडे यांच्याशी जुळण्यासाठी जास्त वाव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
वसमत वगळता इतरत्र मात्र जाधव यांच्यामुळे सेनेपेक्षा काँग्रेसलाच खूप जास्त सुरुंग लागण्याची चिन्हे होती. खरेतर काँग्रेसनेच जाधव यांची जास्त चिंता करणे अपेक्षित होते. मात्र सेनेने त्यांना माघार घेण्यासाठी मनधरणी केली. जाधव यांच्या नावाची झालेली चर्चा व त्यांनी चालविलेली तयारी पाहता त्यांनी बाहेरही चांगली मते मिळविली असती. त्यात काँग्रेसची मोठी गोची होण्याची भीती होती. शिवाय काँग्रेसचे काही नाराजही गळाला लागले असते. मात्र हा काँग्रेसला बसणारा फटकाही वाचला. त्यामुळे जाधव यांच्या माघारीमुळे एकप्रकारे सेनेने स्वत:च पायावर धोंडा पाडून घेतल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
बाहेरचा उमेदवार : माहिती नसल्याचा परिणाम
आ.हेमंत पाटील हे नांदेडचे आमदार असल्याने त्यांना हिंगोली जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीविषयी फारशी माहिती असणे अभिप्रेतच नाही. एकतर त्यांनी थेट उमेदवारीवर दावा करायलाच हजेरी लावली अन् उमेदवारी जाहीर झाल्यावरच पहिल्यांदा राजकीय दौरा केला. त्यामुळे जाधव यांच्यामुळे फायदा की तोटा? याचे गणित त्यांना कळाले नाही. आ. डॉ.मुंदडा यांच्या अनुभवी नजरेतून पाहिले असते तर हे कळाले असते. मात्र तेही बाहेर असल्याने इतर कुणी गांभीर्य दाखविले नाही.

Web Title: The stone at the feet of Jadhav's return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.