राज्यस्तरीय योगशिबिराची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:25 AM2019-06-21T01:25:52+5:302019-06-21T01:27:06+5:30

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या २१ जून २०१९ रोजी शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) असर्जन नांदेड येथे सकाळी ५ ते ७.३० वा. राज्यस्तरीय योग शिबिराचा कार्यक्रम होणार आहे.

State Level Yashishirah Jayant Preparation | राज्यस्तरीय योगशिबिराची जय्यत तयारी

राज्यस्तरीय योगशिबिराची जय्यत तयारी

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती सुमारे दीड लाख नागरिकांचा सहभाग अपेक्षित

नांदेड : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या २१ जून २०१९ रोजी शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक) असर्जन नांदेड येथे सकाळी ५ ते ७.३० वा. राज्यस्तरीय योग शिबिराचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्वामी रामदेव महाराज यांची उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. सर्वस्तरातील नागरिक, महिला, विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय योग शिबिरात जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला आहे. जगभरातील देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित व पतंजली योगपीठाच्या सहयोगाने आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या राज्यस्तरीय योग शिबिरात जवळपास दीड लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे.
स्वामी रामदेव महाराज यांचे आज नांदेड येथे आगमन झाले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती स्वामी रामदेव महाराज यांनी मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली. नियमितपणे योग केल्याने आपला दिवसच नाही तर आयुष्य चांगले होईल. आजारापासून आपण दूर राहू असे बाबा रामदेव यांनी योग दिनाच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना सांगितले. यावेळी बाबा रामदेव यांनी योग करण्याचे महत्व, योग कसा करता येतो, योगमुळे काय फायदे होतात याची प्रात्यक्षिके दाखविली.
यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस राज्यातील ३६ जिल्हा मुख्यालय आणि ३२२ तालुका मुख्यालय अशा ३५८ ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान ५ हजार विद्यार्थी (शाळा/ महाविद्यालये /एनएसएस/ एनसीसी/ स्काऊट गाईड) सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी
राज्यस्तरीय योग शिबिराच्या तयारीला संपूर्ण यंत्रणा लागली आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयेही या योग यज्ञात सहभागी झाले आहे. जिल्ह्यातील शाळांना २१ जून रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. योग शिबिरात विद्यार्थी, शिक्षकांना सहभागी होता यावे, यासाठी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. शाळांमध्येही योगशिबीर घेण्याची सूचना केली आहे.

Web Title: State Level Yashishirah Jayant Preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.