श्री क्षेत्र माळेगावला साडेपाच कोटींचा निधी साडेपाच कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:49 AM2017-12-19T00:49:37+5:302017-12-19T00:49:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : श्रीक्षेत्र माळेगावच्या विकासासाठी ६ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील ...

 Rs.5.5 crores of funds worth Rs.5.5 crores in Shri Sector Malagaa | श्री क्षेत्र माळेगावला साडेपाच कोटींचा निधी साडेपाच कोटींचा

श्री क्षेत्र माळेगावला साडेपाच कोटींचा निधी साडेपाच कोटींचा

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : श्रीक्षेत्र माळेगावच्या विकासासाठी ६ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्हाधिकाºयांकडे वर्ग करण्याचे आदेश राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. या निधीतून माळेगाव येथील विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी माळेगाव यात्रेत ५ कोटी ५५ लाख ५५५ रुपये देण्याची घोषणा केली होती. हा निधी कधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हा निधी मिळाला नसल्यामुळे राजकारणही रंगले होते. अखेर माळेगाव यात्रा बहरात असतानाच राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागाने माळेगावसाठी ६ कोटी ९५ लाख ३६ हजारांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून माळेगाव येथील पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. यासाठी तत्काळ साडेपाच कोटी रुपये जिल्हाधिकाºयांकडे वर्ग करण्याचे आदेशही दिले आहेत. या निधीतून करण्यात येणाºया पायाभूत विकास कामांमध्ये दर्शन मंडप, अन्न क्षेत्रालय, स्वच्छतागृह, प्रवासी निवारा, यात्रा व मंदिर परिसरात सुविधा, गुरांना पाणी पिण्यासाठी हौद, धोबीघाट, पार्कींग सोय, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, यात्रा कमान गेट, वीजपुरवठा, पथदिवे, अग्निशमन यंत्रणा, बोअरवेल, पंपहाऊस विकासकामांचा समावेश आहे.
ही कामे ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जी कामे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रस्तावित केली जाणार आहेत त्या कामासाठी सदर देवस्थानाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे, असेही नमूद करण्यात आले आहे. सदर निधीतून होणाºया कामांच्या खर्चाबाबत वेळोवेळी शासनास माहिती सादर करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. दरम्यान, या निधीच्या उपलब्धतेपूर्वी राजकीय रंगही देण्यात आला होता. माळेगाव यात्रेच्या जिल्हा परिषदेत झालेल्या पहिल्या आढावा बैठकीत काही जि.प. सदस्यांनी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला निधी कधी मिळणार ? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचवेळी यात्रेदरम्यान रविवारी झालेल्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्र्यांनी निधी घोषित करुन न देणे ही बाब उचित नसल्याचे सांगितले होते. तसेच या यात्रा कालावधीत निधी मिळेल का? असा सवाल उपस्थित केला होता. त्याचवेळी लोहा- कंधार मतदार संघाचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी हा निधी यात्रेदरम्यान प्राप्त होणार असल्याचे यात्रा नियोजनाच्या जिल्हा परिषदेत आणि माळेगाव यात्रेत झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असल्याचेही ते म्हणाले होते. त्यामुळेच हा निधी प्राप्त झाल्याचे आ. चिखलीकर यांनी सांगितले.
४माळेगाव येथे कुस्तीच्या दंगली घेण्यात आल्या. या दंगलीच्या उद्घाटनप्रसंगी आ. चिखलीकर यांनी कुस्तीगीर हे राज्याची शान आहेत. अनेक पहेलवान माळेगावातून घडले आहेत. पुढच्या माळेगाव यात्रेपर्यंत येथे कुस्तीगिरांसाठी कुस्तीचे स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती माधवराव मिसाळे, लोहा पं.स. सभापती सतीश उमरेकर आदींची उपस्थिती होती.
कुस्तीचे स्टेडियम उभारण्याचे प्रयत्न

Web Title:  Rs.5.5 crores of funds worth Rs.5.5 crores in Shri Sector Malagaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.