नांदेड परिमंडळात नागरिकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून भरले १० कोटींचे वीज बिल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 03:47 PM2017-12-19T15:47:37+5:302017-12-19T19:33:21+5:30

डिजिटल इंडियाच्या मोहिमेस महावितरणचे वीज ग्राहक प्रतिसाद देत आहेत. महावितरण कंपनीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा घेत नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक गटातील ४६ हजार वीजग्राहकांनी नोव्हेंबर  महिन्यात आॅनलाईन बिल भरण्याचा पर्याय स्वीकारुन १० कोटी ८७ लाख रुपयांचा वीजबिल भरणा महावितरणच्या खात्यात केला आहे.

Power bill of 10 crores filled through citizens' online bill in Nanded area | नांदेड परिमंडळात नागरिकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून भरले १० कोटींचे वीज बिल

नांदेड परिमंडळात नागरिकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून भरले १० कोटींचे वीज बिल

googlenewsNext

नांदेड : डिजिटल इंडियाच्या मोहिमेस महावितरणचे वीज ग्राहक प्रतिसाद देत आहेत. महावितरण कंपनीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा घेत नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक गटातील ४६ हजार वीजग्राहकांनी नोव्हेंबर  महिन्यात आॅनलाईन बिल भरण्याचा पर्याय स्वीकारुन १० कोटी ८७ लाख रुपयांचा वीजबिल भरणा महावितरणच्या खात्यात केला आहे.
नांदेड परिमंडळांतर्गत नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यांचा समावेश असून आॅनलाईन बिल भरण्यास सर्वाधिक पसंती नांदेड मंडळातील वीज ग्राहकांनी दिली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांनी आॅक्टोबरच्या तुलनेत वाढ करत नोव्हेंबर महिन्यात २९१९३ वीजग्राहकांनी ६ कोटी ३३ लाख रूपयांचा भरणा केला आहे. यामध्ये नांदेड शहर विभागाच्या १७७१७ वीजग्राहकांनी ३ कोटी ४६ लाख रुपयांचा भरणा आॅनलाईनचा वापर करुन केला आहे. तर नांदेड ग्रामिण विभागाच्या ४०८५ वीजग्राहकांनी ६४ लाख, देगलूर विभागाच्या ५५२७ वीजग्राहकांनी  १ कोटी २७ लाख आणि  भोकर विभागाच्या  ३८६४  वीजग्राहकांनी ८६ लाख रुपयांचा भरणा आॅनलाईन पद्धतीने केला आहे.

त्याचबरोबर परभणी मंडळातील ९२०९ वीजग्राहकांनी  २ कोटी २५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये परभणी विभाग क्रमांक एक मधील ५६३९ वीजग्राहकांनी १ कोटी ३५ लाख तर परभणी विभाग क्रमांक दोन मधील ३५७० वीजग्राहकांनी ९० लाख तसेच हिंगोली मंडळातील ७६३५ वीजग्राहकांनी २ कोटी ३० लाख रुपयांचा आॅनलाईन भरणा केला आहे.

 

Web Title: Power bill of 10 crores filled through citizens' online bill in Nanded area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.